शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत नैराश्येतून विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: July 22, 2016 01:46 IST

अकरावी प्रवेशाचा घोळ अद्याप सुटला नसून चांगले गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे

कळंबोली : अकरावी प्रवेशाचा घोळ अद्याप सुटला नसून चांगले गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. कळंबोलीत गुरुवारी सायंकाळी सुधागड कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने बहिणीच्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ८२ टक्के गुण प्राप्त करूनही चारही लिस्टमध्ये नंबर न लागल्याने तिने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.पुष्पा धनाजी सूर्यवंशी (१६) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची आटपाडी येथे राहणारी असून सध्या मावस बहिणीकडे शिक्षण घेत होती. दहावीला ८२ टक्के गुण मिळविल्यानंतर तिने अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा याकरिता आॅनलाइन अर्ज भरला होता. तिने दहावीची परीक्षाही याच सुधागड शाळेतून दिली होती. त्यामुळे याच ठिकाणी तिला अकरावीकरिता प्रवेश हवा होता. परंतु कटआॅफ लिस्ट ८६ टक्क्याला बंद झाली. त्यामुळे पुष्पाला नैराश्य आले. मॅनेजमेंट कोट्यातून आॅफलाइन प्रवेशाकरिता तिचे पालक भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते अशोक मोटे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील होते. त्यांनी या संदर्भात प्राचार्य इक्बाल इनामदार यांची भेट घेवून प्रवेशाकरिता विनंती केली होती. इनामदार यांनी सुध्दा कोणतेही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, त्यातल्या त्यात सुधागडमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा याकरिता काऊन्सिलिंग राऊंडमध्ये प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता शुक्र वारपर्यंत थांबण्यास पुष्पाच्या पालकांना सांगितले होते. करिअरबाबत अतिशय गंभीर असलेल्या पुष्पाने गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कळंबोली सेक्टर-४ मधील शिवदर्शन इमारतीतील घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास आम्ही सुरू केला आहे. शुक्र वारी शाळेत जावून याबाबत माहिती घेवून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)