शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून प्रियकराची आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2017 11:08 IST

प्रेयसीबरोबर झालेल्या वादातून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
 
उल्हासनगर, दि. 20- सोशल मीडियाचा वापर आपण सगळेच करतो आहे. चांगले-वाईट असे दोन्हीही प्रकारचे परिणाम सोशल मीडियाच्या वापरामुळे दिसून येत आहेत. पण सध्या मात्र सोशल मीडिया किती घातक ठरतो आहे, याची अनेक उदाहरणं बघायला मिळत आहेत. असाच एक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. प्रेयसीबरोबर झालेल्या वादातून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पण यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या तरूणाने प्रेयसीला व्हिडीओ कॉल केला आणि त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे. उल्हासनगरमध्ये हा प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरूणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
उल्हासनगरमधील कॅम्प नंबर पाचच्या जवळ असलेल्या एनक्लेव्ह रेसिडेन्सीमध्ये राहणारा हनी याचे नालासोपारातील राखी पात्रा  या तरुणीशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी वाद होऊन त्यांच्यातील नातं संपल होतं. पण नंतर तो वाद मिटल्याने त्यांनी लग्न करण्याचंही ठरवलं होतं. काही दिवसांपूर्वी ते दोघं भेटले पण त्यावेळी त्यांच्यात किरकोळ गोष्टींवरून वाद झाला. यानंतर हनी याने घरी परतल्यानंतर बेडरूममधील पंख्याला लटकून आत्महत्या केली.  आत्महत्या करत असताना त्याने राखीला व्हिडीओ कॉल केला आणि आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.  पण राखीसुद्धा त्यावेळी रागात असल्याने तिने त्याला आत्महत्या करण्यापासून न रोखता आत्महत्या करून दाखवच असं आव्हान दिलं होतं, असा आरोप हनीच्या वडिलांनी केला. या प्रकरणी राखी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
विशेष म्हणजे तब्बल 20 दिवसांनंतर हा संपूर्ण प्रकार हनीचे वडील नरेश आसवानी यांना समजला. त्यानंतर त्यांनी हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये 18 जून रोजी हनीच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तर व्हॉट्सअॅप कॉलचा व्हिडीओ मिळतो का? याच्या प्रयत्नात पोलीस आहेत.