शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

घारापुरीत मित्रानेच केली मैत्रिणीची हत्या

By admin | Updated: November 7, 2014 04:49 IST

उरणमधून सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवतीची तिच्या मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षा सुनील पडते (२१, रा. विनायक केगाव) असे तिचे नाव आहे.

उरण : उरणमधून सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवतीची तिच्या मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षा सुनील पडते (२१, रा. विनायक केगाव) असे तिचे नाव आहे. तिच्या मित्राने सात महिन्यांपूर्वीच तिला घारापुरी बेटावरील निर्जन जंगलात नेले होते आणि तिची गळा आवळून हत्या केली होती. मोरा सागरी पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. प्रवीण म्हात्रे (२६, रा. घारापुरी) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.परिचारिका असणाऱ्या वर्षाचा विवाह ठरला होता. विवाहाच्या दोन दिवस आधी ती आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर लग्नाचा दिवस उजाडल्यानंतरही वर्षा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मोरा सागरी पोलीस ठाण्यात २४ एप्रिलला तक्रार दाखल केली. जाताना ती मोबाइल सोबत घेऊन गेली होती, मात्र मोबाइलवरूनही तिचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यात आली. वर्षा प्रवीणच्या संपर्कात असल्याचे आणि त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे उघड झाले. प्रवीणला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने वर्षा ज्या दिवशी बेपत्ता झाली त्याच दिवशी तिला घारापुरी बेटावर नेऊन तिचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. तिचा मृतदेह जंगलात निर्जन ठिकाणी पुरून ठेवल्याची माहिती त्याने दिली. तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण पथकासह घटनास्थळी गेले आणि पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला. अन्य साथीदारांचाही शोध पोलीस घेत आहेत. (वार्ताहर)