शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीखाली येऊनही मुलगी वाचली

By admin | Updated: June 5, 2017 06:07 IST

दैव बलवत्तर असेल, तर काळही माणसाच्या जिवावर घाव घालू शकत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दैव बलवत्तर असेल, तर काळही माणसाच्या जिवावर घाव घालू शकत नाही. याची प्रचिती कुर्ला रेल्वे स्टेशनवरील एका घटनेतून आली आहे. भरधाव जाणाऱ्या रेल्वेखाली येऊनही १४ वर्षांच्या मुलीचा जीव वाचल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रणातून समोर आले आहे. गुरुवारच्या या घटनेचा हा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला.कुर्ला रेल्वे स्थानकात गुरुवारी रूळ ओलांडताना १४ वर्षांची एक मुलगी अचानक वेगात असलेल्या मालगाडीखाली आली. आश्चर्याची बाब म्हणजे, मालगाडी तिच्यावरून जाऊनदेखील या मुलीला इजा झाली नाही. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर मालगाडी थांबवण्यात आली. त्यानंतर, या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही मुलगी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वरून ६ वर ट्रॅक ओलांडून जात होती. एअरफोन लावून मोबाइलवर बोलत ती ट्रॅकमध्ये उतरली. त्याच वेळी फलाट क्रमांक ६ वरून एक मालगाडी वेगाने सीएसटीच्या दिशेने येत होती. ही मुलगी ट्रॅकवरून येत असल्याचे काही प्रवाशांनी पाहताच त्यांनी आरडाओरडा करत, तिला बाजूला होण्यास सांगितले, पण ती फोनवर बोलण्यात मग्न असल्याने, तिच्या हे लक्षातच आले नाही आणि अखेर गाडीने तिला धडक दिली. गाडीने धडक दिल्याने या मुलीचा मृत्यू झाला असावा, असे प्रत्यक्षदर्शींना वाटले. मात्र, काही प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून पाहिले असता, ही मुलगी दोन्ही ट्रॅकच्या मधोमध सुखरूप होती. रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, मुलीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून तिला सोडून देण्यात आल्याचे, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भोरूडे यांनी सांगितले.