शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

ती युवती गोवा पोलिसांच्या कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 02:05 IST

उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार दिल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील एका युवतीला गोवा पोलिसांनी अटक केली.

- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार दिल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील एका युवतीला गोवा पोलिसांनी अटक केली. तपासामध्ये सर्व पुरावे तिच्याविरुद्ध गेल्याची माहिती गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी मंगळवारी दिली.उल्हासनगर येथील किशोर केसवानींविरुद्ध गोवा पोलिसांनी मार्च २0१६मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये केसवानी यांनी गोव्याच्या न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केसवानी यांनी आॅक्टोबर २0१६मध्ये गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी केसवानी यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित युवतीसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेच्या वेळी केसवानी हे मुंबईत होते. काही सीसीटीव्ही फुटेजवरून ते स्पष्ट झाले असल्याची माहिती अंजुना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दिली. ज्या हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार झाला होता, त्या हॉटेलमधील कर्मचारी किशोर केसवानी यांना ओळखू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीमध्येही अत्याचाराचे पुरावे मिळाले नाहीत. न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.