भार्इंदर : नयानगर परिसरात एका आठवर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला मीरा रोड पोलिसांनी शनिवारी गजाआड केले आहे.आरोपी युवकाचे नाव अकबर अन्वर हुसैन जरीवाला असे आहे. पीडित बालिका दुपारच्या वेळेस शाळेतून घरी जात असताना अकबर तिचा पाठलाग करीत होता. ज्या वेळी ती मुलगी एका निर्जनस्थळी आली तेव्हा अकबरने स्वत:जवळचे पैसे खाली फेकून तुझे पैसे पडल्याचे तो तिला सांगू लागला. त्यावर तिने ते पैसे आपले नसल्याचे सांगून ती पुढे चालू लागली. परंतु, ते पैसे तुझेच असल्याचे अकबर तिला जबरदस्तीने सांगू लागला. त्यानंतर, ती बालिका पैसे उचलण्यासाठी सरसावली, त्या वेळी अकबरने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तिने कशीबशी आपली सुटका केली. दुसऱ्या दिवशी तिच्या आईने अकबरला आवाज दिला. अकबर तिथे पोहोचला असता त्याने त्या मुलीला पाहून पळ काढण्यास सुरुवात केली. तिच्या आईने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी अकबरला मीरा रोड पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)
मुलीचा विनयभंग करणा-यास अटक
By admin | Updated: March 30, 2015 02:37 IST