शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणी इसिसच्या संपर्कात

By admin | Updated: December 18, 2015 03:19 IST

इसिस (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या अवघ्या

- एटीएसकडून समुपदेशन सुरू

पुणे : इसिस (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या अवघ्या १६ वर्षांच्या मुलीला इसिसने आपल्या जाळ्यात ओढले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून ही मुलगी इसिसच्या संपर्कात आली. अवघ्या चार महिन्यांच्या काळात या मुलीच्या वर्तनात कमालीचा बदल झाला. इसिसच्या संपर्कातील तरुणांच्या सोशल मीडियावरील अनेक ग्रुप्समध्ये ही मुलगी सहभागी झाली. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पुणे युनिटकडून या मुलीचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. एटीएसच्या (दहशतवाद विरोधी पथक) पुणे युनिटचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसचे अतिरीक्त महासंचालक विवेक फणसळकर, विशेष महानिरीक्षक निकेत कौशिक यांना पुण्यातील एक मुलगी इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. तिचा शोध सुरु केला असता शहरातील नामांकित महाविद्यालयात ही मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिकत असल्याचे समजले. उच्च विद्याविभूषीत कुटुंबातील ती असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या या मुलीला दहावीमध्ये ९० टक्के गुण मिळाले आहेत. चार महिन्यांपूर्वी टीव्हीवर इसिस संदर्भातील बातम्या पाहून तिने या संघटनेची अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. वृत्त वाहिनी आणि इंटरनेटमार्फत शोध घेताना श्रीलंकेतील एकाशी तिचा संपर्क झाला. सध्या हा श्रीलंकन तरुण पोलिसांच्या अटकेत आहे. तिला व्हॉट्सअ‍ॅप, व्टिटर, टेलिग्राफ आदी ग्रुप्समध्ये सामील करुन घेण्यात आले. फेसबुकवर तिने अकाऊंट उघडले. त्यामध्ये २०० च्या आसपास निवडकच तरुणांना फ्रेन्ड करुन घेतले होते. या ग्रुपमधून तिचे ‘ब्रेन वॉशिंग’ सुरु झाले. ग्रुप्समधे फिलीपिन्स, श्रीलंका, इंग्लंड, केनिया, दुबई, सौदी अरेबिया, युरोपातील तरुणही सदस्य आहेत. राजस्थान, तामीळनाडू, कर्नाटक, जम्मू काश्मिर, आंध्रातील तरुणही या ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपचा सदस्य मोहम्मद सिराजुद्दीन यालाही नुकतीच राजस्थानात अटक झाली आहे. - अवघ्या चार महिन्यातच तिने जिन्स पँट, मिनी स्कर्ट घालणे सोडून दिले. कुटुंबियांना तिच्यातील बदल जाणवत होता. याबाबत आई-वडील रागावलेही होते. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर नेमकी काय उत्तरे द्यायची याबाबतही तिला मार्गदर्शन करण्यात आले होते. ग्रुपमधील कोणत्याही सदस्याशी फोनवर वा प्रत्यक्ष संपर्क न साधता केवळ सोशल मीडियाचाच वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. संबंधित मुलीचे समुपदेशन सुरू आहे. इसिसकडून अल्पवयीन मुले आणि मुलींना भडकावण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पालकांनी आपल्या मुलामुलींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या राहणीमानातील बदल, सोशल नेटवर्किं ग साईट्सवरील अकाउंट्स, महाविद्यालयातील तसेच बाहेरचे मित्र याची माहिती ठेवावी. - भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस आयुक्त, पुणे युनिट