शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणे विद्यार्थिनीला पडले महागात

By admin | Updated: July 8, 2017 06:17 IST

भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या पायऱ्यांवरील अंधाराचा फायदा घेत प्रियकरासोबत रोमान्स करणे १५ वर्षांच्या विद्यार्थिनीला भलतेच महागात पडले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या पायऱ्यांवरील अंधाराचा फायदा घेत प्रियकरासोबत रोमान्स करणे १५ वर्षांच्या विद्यार्थिनीला भलतेच महागात पडले आहे. त्यांच्या रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल होत वडिलांच्या मोबाइलवर आला. संतापलेल्या वडिलांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने मुलाकडे बोट दाखविले. अखेर मुलीच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत प्रियकर मुशरफ अन्सारी तसेच शूटिंग करणारा आनंद इळकर आणि पिंकू यादवलाही आयटी अ‍ॅक्टअंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.भांडुप परिसरात १५ वर्षांची मुलगी राहत असून ती दहावीची विद्यार्थिनी आहे. १५ दिवसांपूर्वी ती प्रियकरासोबत ड्रीम्स मॉलच्या काळोख असलेल्या जिन्यावर रोमान्स करत होती. याच मॉलमध्ये हाऊस किपिंगचे काम करत असलेल्या पिंकू आणि आनंदचे त्यांच्यावर लक्ष गेले. आनंदने हा प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. तर पिंकूने तो त्याच्या अन्य मित्रांना व्हॉट्सअ‍ॅप केला. तो व्हिडीओ व्हायरल होत शुक्रवारी मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर पोहोचला. संतापलेल्या वडिलांनी याबाबत मुलीला जाब विचारला. मुलीने प्रियकराविरुद्ध बोट दाखविले. त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्यासोबत हा प्रकार केल्याचे सांगितले. वडिलांनी मुलीसोबत भांडुप पोलीस ठाणे गाठले.मुलगी अल्पवयीन असल्याने भांडुप पोलिसांनी याची दखल घेत पॉक्सो, लैंगिक अत्याचार आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. व्हिडीओ व्हायरल कराल तर कोठडीतसार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे चुकीचे आहे. शिवाय असा व्हिडीओ काढून व्हायरल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे असे प्रकार केल्यास कोठडीची हवा खावी लागेल. त्यामुळे असे करणे टाळा, असे आवाहन भांडुप पोलिसांनी केले आहेत.