शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उ. प्रदेशातून पळालेली तरुणी पुन्हा गायब

By admin | Updated: April 24, 2017 02:26 IST

उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथून आपल्या शेजाऱ्यासोबत एक तरुणी पळून आली होती. तिचा शोध घेण्यासाठी तिचा भाऊ मुंबईत आला.

कल्याण : उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथून आपल्या शेजाऱ्यासोबत एक तरुणी पळून आली होती. तिचा शोध घेण्यासाठी तिचा भाऊ मुंबईत आला. त्याने तिचा शोध घेऊन तो तिला परत उत्तर प्रदेशात घेऊन जात असताना ती कल्याण स्थानकातून पुन्हा गायब झाली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीच्या भावाने तक्रार दिली आहे. तरुणी उत्तर प्रदेशातून शेजाऱ्यासोबत पळून आली. तिच्या शोधासाठी तिचा भाऊ हुसेन हा मुंबईतील घाटकोपर परिसरात आला होता. २० एप्रिलला त्याने घाटकोपर गाठले. त्या ठिकाणी आझादनगरमध्ये मोहसीन नावाच्या तरुणाने तरुणीला पळवून आणले होते. तरुणासोबत तरुणी एका महिलेच्या घरी राहत होती. ही महिला व तरुणाने तिला आमिष दाखवून पळवून आणले होते. ही गोष्ट तरुणीच्या घराशेजारी राहणाऱ्या इक्बालने तिच्या भावाला सांगितली होती. तिच्या शोधासाठी भावासोबत इक्बालही घाटकोपरमध्ये आला होता. बहिणीचा शोध लागल्यावर तिला पुन्हा उत्तर प्रदेशात नेण्यासाठी हुसेनने कल्याणला आणले. २२ एप्रिलला पुष्पक एक्स्प्रेस पकडायची होती. हुसेन तिकीट घेण्यासाठी गेला होता. तो तिकीट घेऊन परतला, त्या वेळी त्याची बहीण त्या ठिकाणी नव्हती. तिचा शोध घेतला, तेव्हा कुठेही आढळली नाही. अखेरीस, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ती दिसली नाही. रविवारी पुन्हा काही रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही पाहण्याचा प्रयत्न केला असता ती तरुणी खंडाळा रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दिसली. (प्रतिनिधी)