शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीची तरुणी रमलीय डाळिंब बागेत

By admin | Updated: December 21, 2015 00:50 IST

जाखणगावची एकता भगतची कहाणी

उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी असे समजले जायचे. कृषिप्रधान देशात शेतकरी हा प्रतिष्ठित व श्रीमंत समजला जायचा. कालांतराने उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती असे समीकरण बनले. शेतीतील बदलते रूप आणि शेतमालाला बाजारपेठेत मिळणारा भाव, यामुळे शेती हा धंदा अडचणीत येत गेला. शिक्षण घेतलेली तरुणाई घाट्यातील शेती करावयास धजत नाही. खटाव तालुक्यातील नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या जाखणगाव येथील शेतकरी कुटुंबातील एकता राजेंद्र भगत याला अपवाद ठरली. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शेतीतच वडिलांना सहकार्य करण्याचा निश्चय केला आहे. एकताचे शिक्षण ईएनटीसी (डिप्लोमा ईन इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन) झालेले आहे. वडिलांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. वडील शेतकरी असल्यामुळे शेती कामाची लहानपणापासूनची सवय तसेच आवड. त्यामुळे शेतीविषयी अधिक माहिती घेणे तिला अधिक आवडते. वडिलांना शेतात आईदेखील सहकार्य करून हातभार लावते. ‘वडिलांनी शिक्षण देऊन मला माझ्या पायावर उभे राहण्याची ताकद व बळ दिले; परंतु त्या आनंदापेक्षा मी इंजिनिअर जरी झाले तरी माझे शेतीशी असलेले नाते मी कधीच विसरणार नाही. उलट मला शेतातील कामे करणे फार आवडते. मला अद्यापपर्यंत नोकरीच्या पाठीमागे लागावे, असे वाटलेच नाही. उलट माझा मोकळा वेळ मी शेतातच अधिक घालवते. शेती करत असताना आता रासायनिक खतांचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे मातीचा पोत खराब होत चालला आहे. सेंद्रिय खतांची आणि हे केवळ बोलण्यापुरतेच न ठेवता आमच्या शेतात आम्ही सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करतो. नवनवीन तंत्रज्ञान तसेच इंटरनेटमुळे जग जवळ आल्यामुळे एकताने घरी बसून इंटरनेटवरून आता प्रचलित होत असलेली हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनावरांचे खाद्य बनवण्याच्या तंत्राचा वापर करून शेतातील पिकांबरोबरच शेतीपूरक व्यवसायालाही महत्त्व देऊन गोठ्यातील जनावरांना देखील सेंद्रिय पद्धतीने खाद्य देऊन त्यांची निगाही राखण्यात एकता कमी पडलेली नाही.नम्रता भोसले