शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धक्काबुक्कीत पोटात चाकू घुसून मुलीचा मृत्यू!

By admin | Updated: March 1, 2017 01:53 IST

गोरेगावात जन्मदात्या बापाच्या हातातील चाकू हृदयात घुसून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

मुंबई : गोरेगावात जन्मदात्या बापाच्या हातातील चाकू हृदयात घुसून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी भांडणात शेजाऱ्यांकडून होणाऱ्या मारहाणीतून मुलीची सुटका करताना हा प्रकार घडला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.गोरेगाव मोतीलालनगर क्रमांक १मध्ये नालंदा कॉलनीत राजेश आगावणे व त्यांची पत्नी सविता हे दाम्पत्य राहते. त्यांना पूजा आणि मेघना या दोन मुली आहेत. आगावणे यांचे याच परिसरात राहणाऱ्या घोडेराव आणि तेलोरे कुटुंबीयांशी रोज छोट्या-मोठ्या कारणावरून खटके उडत होते. सोमवारी सकाळी १० वाजता मेघनाचा पाय पाण्याच्या टपाला लागला. या क्षुल्लक कारणावरून मंदा आणि आगावणे कुटुंबीयात वाद झाले. हे प्रकरण गोरेगाव पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही पक्षांची क्रॉस एनसी दाखल केली आणि त्यांना समज देऊन सोडून दिले. मात्र त्यामुळे यांच्यातील वाद मिटला नाहीच; उलट आपापसांतील राग अधिकच तीव्र झाला. ज्याने मेघनाचा बळी घेतला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी मंदा घोडेराव (४९), सुभाष घोडेराव (५५), शारदा घोडेराव (२२), शीतल घोडेराव (२६), प्रिया तेलोरे (२३) आणि स्मिता तेलोरे (२२) यांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले. या सर्वांनी मेघनाला मारहाण केली असा तिच्या घरच्यांचा आरोप आहे. तिचे वडील राजेश यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे गोरेगाव पोलिसांकडून सांगण्यात आले. अटक संशयित आरोपींना मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>सीसीटीव्हीची पडताळणी‘माझ्या मुलीवर तेलोरे आणि घोडेस्वार या दोन्ही कुटुंबांतील लोकांनी एकत्र येऊन हल्ला केला. रात्री साडे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. तेव्हा आम्ही सर्व घरात होतो. तिचा आवाज ऐकून बाहेर आलो, तेव्हा सर्व जण मिळून मेघनाला मारत होते. त्यांनीच माझ्या मुलीचा जीव घेतल्याचे मेघनाच्या आईने रडतच पत्रकारांना सांगितले. त्यानुसार आसपासच्या सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी पोलीस करीत आहेत.>...आणि ठिणगी पडलीमेघनाच्या घरच्यांचे सकाळी घोडेराव आणि तेलोरे कुटुंबीयांशी भांडण झाले. त्यामुळे आगावणे कुटुंबीयांवर त्यांचा राग होताच. मात्र मेघनाची मोठी बहीण पूजा ही कामावरून घरी आली आणि तिने घरच्यांना विचारले. तेव्हा घडला प्रकार मेघनाने तिला सांगितला. त्याचा जाब विचारण्यासाठी पूजा मेघनाला घेऊन घोडेराव आणि तेलोरे यांच्या घरी गेली. तेव्हा त्यांनी मेघनाला पडकले आणि मारहाण करू लागले. तिचा आवाज घरात भाजी कापत बसलेल्या राजेश यांनी ऐकला आणि ते धावत बाहेर आले. तेव्हा मुलीला मारहाण करणाऱ्या बायकांच्या तावडीतून त्यांनी तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. ज्यात मेघनाला या महिलांनी धक्का दिला. जिच्या मागोमाग राजेश यांनाही त्यांनी ढकलले आणि ते नेमके चाकूसह मेघनाच्या अंगावर जाऊन पडले. हा चाकू थेट तिच्या हृदयात घुसला आणि तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.>मेघनावर अंत्यसंस्कारतेलोरे आणि घोडेराव कुटुंबीयांवर योग्य कारवाई न केल्याने मेघनाचा बळी गेला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांसह स्थानिकांकडूनदेखील करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांसोबतही स्थानिकांची बाचाबाची झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसी कारवाईलादेखील विलंब झाला. अखेर दुपारी अडीच-तीनच्या सुमारास मेघनावर अत्यंत शोकाकूल वातावरणात ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.