शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने रोखला स्वत:चा बालविवाह!

By admin | Updated: January 21, 2016 03:37 IST

आई-वडील जबरदस्तीने लावत असलेल्या लग्नाला विरोध करीत, १५ वर्षांच्या मुलीने पोलिसांकडे धाव घेत स्वत:चाच बालविवाह रोखला.

पुणे : आई-वडील जबरदस्तीने लावत असलेल्या लग्नाला विरोध करीत, १५ वर्षांच्या मुलीने पोलिसांकडे धाव घेत स्वत:चाच बालविवाह रोखला. एवढचे नव्हे, तर तिने आई-वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचेही धाडस दाखविले. पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाने तिला साथ देत, तिच्या आई-वडिलांसह नियोजित पती आणि त्याच्या कुटुंबीयांना कायद्याचा हिसका दाखवला.मंगळवार पेठेत राहणारी आशा (बदललेले नाव) अकरावीत आहे. तिचे वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये तिचे वडील व काकांनी तिचे लग्न ठरविण्यास सुरुवात केली. विरोध केल्यानंतर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत, लग्नाला तयार केले.आशाने पुन्हा लग्नास विरोध केल्याने तिच्यावर कुटुंबीयांनी मानसिक व शारीरिक अत्याचार केले. नियोजित मुलाशी (२५) लग्न केले नाही, तर मारून टाकण्याची धमकी तिला पुन्हा देण्यात आली. त्याच्याशी वारंवार फोनवर बोलण्याची सक्तीही तिच्यावर करण्यात आली. कुटुंबीयांचा अत्याचार वाढल्याने आशाने तिच्या चुलत आजी-आजोबांकडे धाव घेतली. त्यांनीच तिला दीड महिने सांभाळले. वडिलांकडून तिच्यावर पाळत ठेवली जात होती, तसेच रस्त्यात गाठून ते मारहाणही करत होते. शेवटी त्यांच्या त्रासाला कंटाळून, आशाने आजी आजोबांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्या प्रणिता जगताप यांची मदत घेतली आणि तक्रार केली.