शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तूरडाळ भाव नियंत्रणात येणार- गिरीश बापट

By admin | Updated: July 12, 2016 17:24 IST

राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांनी तूर डाळीचा पेरा वाढवावा, उत्पादकता वाढवावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12 : राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांनी तूर डाळीचा पेरा वाढवावा, उत्पादकता वाढवावी यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच बाजारपेठेत तूर डाळीच्या अनेक प्रतवारी असल्या तरी त्यांची किंमत 120 रुपयांपेक्षा जास्त जावू देणार नाही, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज रविभवन येथे आयोजित बैठकीत दिले.डाळीची साठवण क्षमता व त्याची मूल्य याची माहिती जनतेला व्हावी, चढ्या भावाने तूर डाळीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वचक बसावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज रविभवन येथे तूर डाळीची आयातदार, मिलर्स, घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार अनिल सोले, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी एन. आर. वंजारी, पुरवठा उपायुक्त आर. एस. आडे, अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे, एल. जे. वार्डेकर तसेच वैध मापन शास्त्र, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी, नागपूर विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी राज्याचे डाळीचे दर नियंत्रित ठेवण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.उपास्थितांशी संवाद साधतांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट म्हणाले की, सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणात तूर डाळीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे नागरिकांना कमी भावात तूर डाळ बाजारपेठेत उपलब्ध व्हायला हवी. सण समारंभाच्या काळात तूर डाळीच्या मागणीत अधिक होते. हे बघताच तूर डाळ व्यापाऱ्यांनी शासनाला सहकार्य करुन डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. तूर डाळीचा पेरा वाढविण्यासंदर्भात बोलतांना श्री. बापट पुढे म्हणाले की, मागणीच्या तुलनेत तूर डाळीचा पुरवठा कमी आहे. परदेशातून भारतामध्ये तूर डाळ आयात केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी तूर डाळीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घ्यावे, यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल. तसेच तूर डाळीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रतवारीनुसार तूर डाळींच्या किमतीचे फलक दुकानामध्ये लावावे.केंद्र सरकारने तूर डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलली असून तूर डाळीचा बफर स्टॉक केला आहे. गरजेनुसार त्याचा वापर करण्यात येत आहे. केंद्र सरकारतर्फे साडे सातशे टन तूर डाळीचा पहिला टप्पा राज्याला मिळाला आहे. यानंतर राज्याला दोन हजार टन तूर डाळीचा दुसरा स्टॉक लवकरच मिळणार आहे. तसेच मध्यम वर्गीय गरिबांना तूर डाळ परवडावी यासाठी रेशन, अंत्योदय बीपीएल धारकाला दर महिन्याला एक किलो तूर डाळ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.