शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गिरगावकर पाणी वाचवण्यासाठी सरसावले

By admin | Updated: May 30, 2016 02:11 IST

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळानंतर सर्वच ठिकाणी पाण्याची साठवण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबई : राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळानंतर सर्वच ठिकाणी पाण्याची साठवण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा पाऊस जास्त होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. पण, तरीही पुढच्या वर्षी पाण्याची कमतरता भासू नये आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी गिरगावकर सज्ज झाले आहेत. गिरगावातील विहिरींची पाहणी करण्यात आली असून, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी करण्यात येणार आहे. गिरगाव आणि आजूबाजूच्या परिसरात विहिरी आहेत. पूर्वीच्या काळी या विहिरींचा वापर केला जायचा. पण, गेल्या काही वर्षांत शहरीकरण होताना विहिरींचे मूळ स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे वापरातल्या विहिरी बंद झाल्या. तर, काही ठिकाणी टॉवर झाल्यामुळे विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. जमिनीखाली टाकलेल्या वायर अशा काही कारणांमुळे जिवंत स्रोत मृत झाले आहेत. हे स्रोत जिवंत करण्यासाठी पाहणी सुरू करण्यात आली आहे. आंग्रे वाडी, गोमांतक वाडी आणि साई चौक येथील विहिरींची तपासणी ‘आम्ही गिरगावकर’च्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. या तिन्ही ठिकाणी विहिरी आहेत. मात्र, आता त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने पुढाकार घेऊन येथील स्थानिकांशी चर्चा केली. येथील विहिरींची पाहणी करण्यात आली असून, पुनर्वापरासाठी काय उपाययोजना आखता येतील, याची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा प्रकारे आणि कुठे करता येऊ शकते याची प्राथमिक चर्चा सध्या गिरगावात सुरू असल्याची माहिती ‘आम्ही गिरगावकर’च्या रोहित जाधव यांनी दिली. गिरगावातील काही विहिरींतून पाण्याची चोरी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)