शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम अलींचा ठाण्यात कार्यक्रम

By admin | Updated: January 18, 2016 03:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेच्या वतीने फेब्रुवारीत होणाऱ्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांची मैफल होणार असल्याचे

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेच्या वतीने फेब्रुवारीत होणाऱ्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांची मैफल होणार असल्याचे टिष्ट्वट आव्हाड यांनी रविवारी केले. कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला असल्याने गुलाम अलींवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारीगाव-पारसिकनगर येथील ९५ फूट मार्गावर ‘ठाणे आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. याच ठाणे महोत्सवात गुलाम अली यांची मैफल होणार असल्याचे आमदार आव्हाड यांनी टिष्ट्वटरवरून जाहीर केले. आपण गुलाम अली यांना आमंत्रण दिले असून, त्यांनी ते स्वीकारले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आव्हाड यांना ‘गुलाम अलींचा कार्यक्रम आयोजित करण्याची हिंमत त्यांनी दाखवावीच,’ असे आव्हान दिले आहे. आव्हाडांचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवसेनेचा गुलाम अली यांना असलेला विरोध माहीत असतानाही त्यांच्या मैफलीचे आयोजन करण्याची घोषणा करणे हा आव्हाड यांचा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीकाही सरनाईक यांनी केली. आव्हाड यांना ठाणेकरांचे मनोरंजन करण्याकरिता मैफल आयोजित करायचीच असेल तर भारतात गझल गायक नाहीत का, असा सवाल सरनाईकांनी केला.शिवसेनेने अलीकडेच गुलाम अली यांची मैफल आयोजकांना दमदाटी करून रद्द करण्यास भाग पाडले होते. पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याचे आयोजन करणारे सुधींद्र कुळकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी शाईफेक केली होती.