शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘घोळा’ची चौकशी होणार!

By admin | Updated: September 10, 2016 04:08 IST

कृषी सेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागांत घोळ झाल्याचे समोर आले आहे.

अकोला : कृषी सेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागांत घोळ झाल्याचे समोर आले आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’ने यासंदर्भात शुक्रवारी वृत्त दिले. सदर प्रकरणात जे मुद्दे समोर आले आहेत, त्याची चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती फुंडकर यांनी ‘लोकमत’ला दिली.कृषी आयुक्तालयाने कृषी सेवकांच्या ७३० पदांसाठी ६ आॅगस्टला परीक्षा घेतली. ६५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबरला जाहीर झाला. परीक्षेत एकच विद्यार्थी दोन ठिकाणी उत्तीर्ण झाला आहे. दोन भावांना सारखेच गुण मिळाले असून, त्यांच्या वयामध्ये केवळ सहा महिन्यांचे अंतर आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज असतानाही काही उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयाची अट ३८ वर्षे असतानाही दोन विद्यार्थ्यांचे ३८ पेक्षा अधिक वय असतानाही त्यांच्यावर विशेष मेहेरनजर दाखविण्यात आली आहे. असे अनेक घोळ विद्यार्थ्यांनीच उघड केले आहेत. त्यासोबतच प्रत्येक विभागात गुणवत्ता यादीमधील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. त्याची कृषीमंत्र्यांनी दखल घेतली आहे. कृषी आयुक्तालयाने घेतलेल्या परीक्षेच्या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी गंभीर आहेत. त्याची शहानिशा झाली पाहिजे. तक्रारींची दखल घेतली असून, कृषी आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे फुंडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>सीआयडी चौकशीची काँग्रेसची मागणीकृषी खात्याचा कारभार माझ्याकडे असताना खात्यातील गैरप्रकाराला आळा घातला होता. भ्रष्टाचारामुळे एक मंत्री घरी गेलेले आहेत. आता कृषी खात्याचे मंत्री काय करतात, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे, असे ते अहमदनगरमध्ये म्हणाले.