शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘गझल’ हे मराठी मनाचे अंग :भीमराव पांचाळे ; अखिल भारतीय गझल संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:32 IST

उर्दूतून मराठी भाषेत गझल आली. इथल्या मातीत ती रु जली नाही तर मराठी मनाचे अंगच झाल्याची प्रतिक्रिया गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई : उर्दूतून मराठी भाषेत गझल आली. इथल्या मातीत ती रु जली नाही तर मराठी मनाचे अंगच झाल्याची प्रतिक्रिया गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित गझल संमेलनाच्या दुसºया दिवशी आयोजित मुक्तचर्चेत ते बोलत होते. सुरेश भट यांनी मराठी मातीत आणलेले हे गझलचे वैभव असेच पुढे नेण्यासाठी गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आले असून, रविवारी या ठिकाणी मराठी गझलविषयी मुक्तचर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहभागी गझलप्रेमींनी विचारलेल्या शंका, अडचणींचे निराकरण करण्यात आले.या ठिकाणी आलेल्या गझलप्रेमींनी गझल आणि भावगीत मधील फरक, समीक्षकेच्या भूमिकेतून गझल, स्वर काफीया, व्याकरण आदींविषयी शंका विचारल्या. शब्दांमधील आशय प्रमाण मानून आणि गायकी दुय्यम स्थानावर ठेवून गझल पेश करण्याचा हुनर अवगत करण्याविषयीही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले. शब्दांमधील आशय स्वरांनी सजवून रसिकांच्या काळजापर्यंत कसा पोहोचेल? याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये गझलप्रेमींना मार्गदर्शन करताना उर्दूचे अंधानुकरण न करता, मराठीत विचार मांडले जाणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला. तरुणपिढीदेखील गझल लिखाण करत असून, आजची पिढी अतिशय ताकदीने लिहित असल्याचे सांगत गझलकारांच्या वतीने या तरुण पिढीचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्णातील गझलप्रेमींनी वाद्यांच्या माध्यमातून गझल सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. गझलेचे नियम, तंत्र काटेकोरपणे सांभाळताना आशयघनताही तितकीच महत्त्वाची असल्याचे या संमेलनाचे अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांनी सांगितले. या मुक्तचर्चेत पनवेलचे गझलकार ए. के. शेख, पुण्याचे इलाही जमादार, प्रल्हाद सोनेवाने, इंदौरच्या शोभा तेलंग यांचा सहभाग होता. गझल सागर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या संमेलनाला सिडको तसेच मोहिनी आर्ट्स अकादमी यांचे सहकार्य लाभले आहे.गझलचे शब्द क्रांतीचे मशाल व्हावेत-गझलचे शब्द विश्वशांती व राष्ट्रशांतीचे दूत व्हावेत; तसे ते क्र ांतीची मशालही व्हावेत. गझल ही वर्तमानातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सूक्ष्मदृष्टीने विचार करण्यासाठी तत्पर असली पाहिजे. समाजातील दु:ख, दैन्य व दारिद्र्य पाहून ती कळवळली पाहिजे, अन्याय पाहून ती चिडली पाहिजे, त्याविरोधात झुंजली पाहिजे व पेटून उठली पाहिजे, असे प्रतिपादन गझलकार प्रल्हाद सोनेवाने यांनी केले.