शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सागरी विमानसेवेला घरघर!

By admin | Updated: December 1, 2014 01:54 IST

वादग्रस्त ठरलेल्या जुहू ते मुळा धरण सी प्लेन सेवेचे अखेर तीनतेरा वाजले आहेत. चार महिन्यांत केवळ चार उड्डाणे झाली

राहुरी (जि. अहमदनगर) : वादग्रस्त ठरलेल्या जुहू ते मुळा धरण सी प्लेन सेवेचे अखेर तीनतेरा वाजले आहेत. चार महिन्यांत केवळ चार उड्डाणे झाली असून, विमान सेवा देणारी कंपनी गाशा गुंडाळण्याच्या मन:स्थितीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे़शनिशिंगणापूर, शिर्डीचे साईबाबा व मेहेरबाबा या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या पार्श्वभूमीवर सागरी विमान सेवा सुरू करण्यात आली़ मुळा धरणावर तयार करण्यात आलेल्या चौथऱ्यावर सी प्लेन उतरण्याची सुविधा करण्यात आली होती़ चौथऱ्यापासून धरणाच्या धक्क्यापर्यंत येण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली होती़ मोठ्या प्रमाणावर प्रवासी उपलब्ध होतील, असा कंपनीचा दावा होता़ त्या दृष्टिकोनातून तिकीट बुकिंगची सुविधा करण्यात आली होती़मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम असताना विमान सेवा सुरू झाली़ विमान सेवेला सुरुवातीला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला़ मात्र कंपनीशी तडजोड करून प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले़ हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला असताना विमानसेवा बंद करण्याच्या विचारापर्यंत कंपनी आली आहे़ श्रीमंतांसाठी असलेली सेवा, असा प्रचार झालेल्या या सेवेकडे भाविक व पर्यटकांनी पाठ फिरविल्याने कंपनीने गाशा गुंडाळण्याचे ठरवले आहे़ नोव्हेंबरमध्ये मुळा धरणावर एकदाही सी प्लेन उतरले नाही़ त्यामुळे विमानसेवा बंद तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्तकरण्यात येत आहे़ याबाबत कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही़ (वार्ताहर)