शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत मेळघाटात भरणार ‘घुंगरू बाजार’

By admin | Updated: October 24, 2016 19:47 IST

मेळघाटात फार पूर्वीपासून कोरकू, गोंड, भिलाल या आदिवासी जमाती वास्तव्य करीत आहेत. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करताना हे आदिवासी बांधव पायात घुंगरू बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर

राम देशपांडे / ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 24 - मेळघाटात फार पूर्वीपासून कोरकू, गोंड, भिलाल या आदिवासी जमाती वास्तव्य करीत आहेत. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करताना हे आदिवासी बांधव पायात घुंगरू बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर प्रत्येक आठवडी बाजारात जाऊन नृत्य दीपोत्सवाचे स्वागत करतात. आदिवासी बांधवांची ही अनोखी परंपरा व त्यांची जीवनशैली जतन करण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी मेळघाटातील ग्राम लवादा येथील ग्राम ज्ञानपीठात ‘घुंगरू बाजार’ भरणार आहे. 

सातपुड्याच्या शेवटचे टोक म्हणजे मेळघाट. ७0 टक्क्यांहून अधिक वन असलेल्या मेळघाटात पुरातन काळापासून आदिवासींच्या विविध जमाती वास्तव्यास आहे. शहरी संस्कृतीपासून लांब राहणाºया या आदिवासी बांधवांनी आपली स्वतंत्र परंपरा व संस्कृती जतन केली आहे. येथे वास्तव्यास असलेल्या गोंड (थाट्या) या आदिवासी जमातीचे बांधव दरवर्षी दीपोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरी करतात. रानावनातील आणि अभयारण्यालगतच्या गावांमध्ये भरणाºया आठवडी बाजारात जाऊन घुंगरू नृत्य सादर केले जाते. दीपोत्सवाच्या स्वागताप्रीत्यर्थ पायात घुंगरू बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर केल्या जाणाºया या नृत्याला ‘घुंगरू बाजार’ असे संबोधले जाते. उत्सव साजरा करण्याची आदिवासी बांधवांची ही अनोखी परंपरा, त्यांची संस्कृती आणि त्यांची जीवनशैली जनत करण्यासाठी संपूर्ण बांबू केंद्र असलेल्या ग्राम लवादा येथील ग्राम ज्ञानपीठाने पुढाकार घेतला आहे. आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विक्री केंद्र असलेल्या ग्राम ज्ञानपीठात रविवार, ६ नोव्हेंबर रोजी ‘घुंगरू बाजार’आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचा दीपोत्सव सजारा करण्याच्या अनोख्या शैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘घुंगरू बाजारा’चा निसर्गप्रेमींनी बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम ज्ञानपीठाचे सुनील देशपांडे, सहदेवराव शनवारे व मारोती शनवारे यांनी केले आहे.