शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

विमानतळाजवळील ‘त्या’ इमारती २ महिन्यात पाडा

By admin | Updated: April 13, 2017 00:33 IST

उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमानतळाजवळील १00 इमारतींना हटवा किंवा इमारतींची उंची कमी करा असा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने डीजीसीए

मुंबई : उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमानतळाजवळील १00 इमारतींना हटवा किंवा इमारतींची उंची कमी करा असा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने डीजीसीए, मुंबई महापालिका आणि विमानतळ प्राधिकरणाला (एएआय) दिला. उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारती विमानांसाठी मोठा धोका असल्याने याबाबत कठोरपणे निर्णय घ्यायला हवा, असे न्या.व्ही.एम.कानडे व सी.व्ही.भडंग यांच्या खंडपीठाने म्हंटले. विकासक किंवा या इमारतीतील रहिवाशांबाबत वाईट वाटून घेण्यास अर्थ नाही. प्रशासन निव्वळ बसून एखाद्या अपघात घडण्याची वाट पाहू शकत नाही, तसेही खंडपिठाने म्हंटले. मुंबई विमानतळ प्राधिकरणाने (एमआयएएल) २0१0 व २0११ मध्ये विमनातळाच्या आजूबाजूच्या इमारतींचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार विमानतळासाठी ११0 इमारती अडथळा ठरत आहेत. बेकायदेशीरपणे उंची वाढवल्यासंदर्भात डीजीसीएने यापूर्वीच संबंधित विकासकांना व इमारतींना नोटीस बजावली आहे. मात्र त्या अंतिम नोटीस नाही. परंतु बुधवारी उच्च न्यायालयाने डीजीसीएला दोन महिन्यात ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश दिले. २0१५ व २0१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार ज्या ३१७ इमारती अडथळा ठरत आहे, त्या इमारतींनाही पुढील तीन महिन्यात हटवण्यासंदर्भात किंवा उंची कमी करण्यासंदर्भात अंतिम आदेश देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)