शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

या नरकयातनेतून आम्हाला सोडवा!

By admin | Updated: November 14, 2014 00:45 IST

शहरातून निघणारा सर्व कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठविला जातो. या कचऱ्याचा परिणाम भांडेवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. भांडेवाडीच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये घरोघरी रुग्ण आहे.

भांडेवाडी परिसरातील वस्त्या आजाराच्या विळख्यात मंगेश व्यवहारे - नागपूरशहरातून निघणारा सर्व कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठविला जातो. या कचऱ्याचा परिणाम भांडेवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. भांडेवाडीच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये घरोघरी रुग्ण आहे. डेंग्यूचा आजार परिसरात चांगलाच फोफावला आहे. परिसरातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी झोन कार्यालयाकडे जात आहे. त्यांच्या तक्रारीवर उपचार करणारे प्रशासन मात्र ढिम्म आहे. या नरकयातनेतून सोडवा, अशी ओरड येथील नागरिक करताहेत. पूर्व नागपुरात आरोग्याच्या समस्येने बजबजलेला भांडेवाडी आजूबाजूचा परिसर आहे. कचरा डम्पिंग यार्डमुळे दुर्गंधी आणि डासांचा उद्रेक प्रचंड प्रमाणात आहे. या यार्डच्या आजूबाजूला जयदुर्गानगर, दीपनगर, एकतानगर, खुशीनगर, अंबेनगर, तुलसीनगर, अब्बुमियाँनगर, पारडी झोपडपट्टी या वस्त्या आहेत. नीरीने हा परिसर प्रदूषित असल्याचा अहवाल महापालिकेला दिला आहे. येथील विहिरीचे, बोअरचे पाणी प्रदूषित झाले आहे. दुर्गंधीमुळे येथील लोकांचे जगणे असह्य झाले आहे. या वस्त्यांमध्ये अनेकांनी प्लॉट घेतले, मात्र दुर्गंधीमुळे त्यांनी येथे वास्तव्य करणे टाळले. त्यामुळे रिकाम्या प्लॉटवर घाण पसरली आहे. परिसरात गटार लाईन नसल्याने, अनेकांनी रिकाम्या प्लॉटवर गटाराचे पाणी सोडले आहे. रिकाम्या प्लॉटवर झाडेझुडपे वाढली आहेत. काही प्लॉटवर कचरा घर झाले आहे. घाण आणि दुर्गंधीमुळे वर्षभर परिसरात घरोघरी रुग्ण आढळतात. सध्या तर मलेरिया, डेंग्यू या आजाराचे रुग्ण तापाने फणफणत पडले आहे. शहरात सर्वाधिक डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण भांडेवाडी परिसरात असल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला आहे. मात्र प्रशासनाकडून कुठलाही सर्व्हे झाला नाही. आरोग्याच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. यासंदर्भात परिसरातील वॉर्ड सुधार समितीतर्फे मनपाच्या लकडगंज झोनला वारंवार तक्रारी करण्यात आल्या. डासांवर अंकुश मिळविण्यासाठी जंतूनाशकाची फवारणीची मागणी केली. त्याकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला. डम्पिंग यार्डला लागून शाळा, महाविद्यालय आहे. लोकांनी घरे बांधली आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील परिसर असतानाही, परिसरातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. दीपनगरातील आकाश बोरसरे नावाचा युवक गेल्या २० दिवसापासून आजारी आहे. मेयो रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही त्याच्या आजाराचे निदान झालेले नाही. सध्या त्याची अवस्था अतिशय गंभीर आहे. खदानीमुळे नागरिक त्रस्त दीपनगरात असलेली खदान येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गडरलाईन नसल्याने येथे परिसरातील घाण पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधी आणि डासांमुळे घरात राहणे कठीण झाले आहे. खदानीमुळेच आजार वाढले आहे. आजपर्यंत ही खदान स्वच्छ झाली नाही. कधीही जंतूनाशकाची फवारणी झाली नाही.