शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जागा सोडवून घ्या

By admin | Updated: July 24, 2014 02:07 IST

भाजपाचे उमेदवार सतत पराभूत होत असलेल्या जागा शिवसेनेला सोडवून घ्या, अशी मागणी मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्हय़ातून आलेल्या पदाधिका:यांनी केली.

औरंगाबाद : भाजपाचे उमेदवार सतत पराभूत होत असलेल्या जागा शिवसेनेला सोडवून घ्या, अशी मागणी मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्हय़ातून आलेल्या पदाधिका:यांनी केली. पदाधिका:यांच्या या प्रश्नाची अगोदरच माहिती असावी, या अविर्भावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जागा सोडवून घेऊ; परंतु त्या बदल्यात भाजपाला कोणती जागा सोडावी, हे सांगा’ असा प्रतिप्रश्न केल्यामुळे पदाधिकारी निरुत्तर होऊन बाहेर येत होते. 
विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील शिवसेनेचे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख व उपशहरप्रमुख या निवडक पदाधिका:यांच्या भेटी घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांची मते जाणून घेतली.  
नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड, जालना, लातूर व औरंगाबाद या सर्वच जिल्ह्यांतून मतदारसंघ सोडवून घेण्याची जोरदार मागणी पदाधिका:यांनी केली. मराठवाडय़ातील विधानसभेच्या 46 जागांपैकी 27 जागा शिवसेना व 19 जागा भाजपाकडे आहेत. या बैठकीत  1क् जागा अधिकच्या सोडवून घेण्याची मागणी पदाधिका:यांनी केली. (प्रतिनिधी)
 
गृहखाते दुर्बल बनले  
दाभोलकरांच्या खुन्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्लॅन्चेटमुळे उपस्थित झालेला वाद दुर्दैवी व हास्यास्पद आहे. सध्या राज्याचे गृहखाते दुर्बल झाले असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केली़  मराठवाडय़ातील शिवसेनेच्या पदाधिका:यांची मते जाणून घेण्यासाठी ते बुधवारी दुपारी औरंगाबादेत आले होते.  
 
नेत्यांसमोरच शिवसैनिकांमध्ये जुंपली
बुलडाणा : शहरात बुधवारी पक्षाचे उपनेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा झाला़ त्यानंतर विश्रमगृहावर गेलेल्या कदम यांच्यासमोरच शिवसैनिकांमध्ये हमरीतुमरी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण केले.  भगव्या सप्ताहानिमित्त बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेचा मेळावा झाला. मेळाव्यात आघाडी सरकारवर टीका करीत कदम म्हणाले, आघाडी सरकारने पंधरा वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले; मात्र या राज्याला प्रगतीपथावर नेण्याऐवजी अधोगतीकडे नेले. महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे करून या सरकारने जनतेच्या पैशावर डल्ला मारला.