शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

माहुली गडावर दारू पार्ट्यांना ऊत

By admin | Updated: September 10, 2016 03:11 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईत शहापूर तालुक्यातील माहुली गडाची भूमिका महत्त्वाची होती.

मुरलीधर भवार,

कल्याण- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईत शहापूर तालुक्यातील माहुली गडाची भूमिका महत्त्वाची होती. परंतु, सध्या या गडावर येणारे पर्यटक सर्रासपणे दारूपार्ट्या करत आहेत. त्यामुळे गडाचे पावित्र्य भंग होत आहे. गडावरील हे गैरप्रकार रोखण्यासाठी जाणता टायगर ट्रेकर्सने राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र, सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी कायदा नसल्याची बोळवण केली आहे. शहापूर पोलिसांनी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे केले आहे. उलट, दारू पार्टी सुरू असल्याचे आढळल्यास आम्हाला कळवा, आम्ही ती रोखण्यासाठी जाऊ, असे आश्वासन ट्रेकर्सना दिले आहे. सरकार व पोलिसांच्या या भूमिकेमुळे ट्रेकर्सने आश्चर्य व्यक्त केले आहे.जाणता फाउंडेशन प्रतिष्ठान व जाणता टायगर ट्रेकर्स या दोन्ही संस्थांचे काम काही तरुण पाहतात. विक्रोळी येथे राहणारे प्रभाकर ताम्हणकर हे २००९ पासून या ट्रेकर्सचे काम करतात. या संस्थेत कल्याणचे दीपक गोवर्धने, रोहित महाले, सुनील चव्हाण आदी तरुणही आहेत. जाणता टायगर ट्रेकर्सने २००९ पासून आतापर्यंत राज्यातील जवळपास ७५ पेक्षा जास्त गड-किल्ले सर केले आहेत. ते दरवर्षी दोनदा माहुली गडाची मोहीम आखत आहेत. गेल्या वर्षापासून गडाच्या पायथ्याशी व माथ्यावर दारूपार्टी रंगत असल्याचे त्यांनी सांगितले.कळसूबाई हे राज्यातील सर्वोच्च शिखर, तर माहुली गड ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात उंच शिखर आहे. या गडाची उंची दोन हजार ७०० फूट आहे. या गडावर शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता. शिवकाळात दळणवळणाची साधने नसल्याने हा गड शहाजीराजे यांना सोयीचा वाटला नाही. त्यामुळे त्यांनी जिजाऊंना शिवनेरी गडावर पाठवले. महाराजांनी स्वराज्याच्या लढाईत तह केला, तेव्हा तहात महाराजांनी २३ गड-किल्ले बादशहाला दिले होते. त्यापैकी माहुली हा एक होता. माहुली गडाच्या पायथ्याला देवदेवतांची मंदिरे आहेत. गडाच्या माथ्यावर महाराजांचा पडका वाडा आहे. गडाच्या पायथ्याशी झोपड्या आहेत. काही दुकाने आहेत. तेथे पर्यटकांची जेवणाची व्यवस्था केली जाते. हीच मंडळी दारूची विक्री करते. त्यामुळे दारू पार्ट्यांना गड परिसरात ऊत आला आहे.दारूपार्टी रोखण्यासाठी गडाच्या पायथ्याशी ट्रेकर्स ग्रुपने २७ जुलैला आंदोलन केले. तसेच एक निवेदन शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे केवळ ४० कर्मचारी असल्याचे सांगितले. गडाच्या पायथ्याशी व गडावर २४ तास बंदोबस्त ठेवणे शक्य नाही. दारू पार्टी निदर्शनास आल्यावर ट्रेकर्सनी फोन केल्यावर आम्ही तेथे पोहोचून पर्यटक खरोखरच बाटलीतून ज्यूस पितात की मद्य, याची पाहणी करू. त्यात ते मद्य पीत असल्याचे आढळल्यास कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.