शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आयुष्याची दिशा घडवण्यासाठी व्हा सारे सज्ज!

By admin | Updated: January 8, 2017 01:22 IST

आजकाल करिअरचे विविध पर्याय आपल्याला उपलब्ध झाले आहेत. त्यात स्वत:चा निभाव लागण्यासाठी आपण ते करिअर करण्यास सक्षम आहोत का, हेही तपासून पाहिले जात आहे.

- डॉ. शिवांगी झरकर आजकाल करिअरचे विविध पर्याय आपल्याला उपलब्ध झाले आहेत. त्यात स्वत:चा निभाव लागण्यासाठी आपण ते करिअर करण्यास सक्षम आहोत का, हेही तपासून पाहिले जात आहे. थोडक्यात, वेगवेगळ््या मार्गाने तुमचं करिअर हे बहरू शकतं. मात्र, ते बहरण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हेच मार्गदर्शन दर आठवड्याला शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञ करतील ‘बहुदिशा’ या सदरातून... करिअर म्हणजे नक्की काय?करिअर म्हणजे, तुमच्या आयुष्याची दिशा आणि जीवन जगण्याची आशा. आजच्या जगात करिअर नसेल, तर तुमचे व्यक्तिमत्त्व एका विनाइंजिनाच्या गाडीप्रमाणे असते की, जी पुढेही जाऊ शकत नाही.... ना चालू शकत. त्याचप्रमाणे, करिअर ही ऊर्जा आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला वेग देते. काहींसाठी करिअर म्हणजे, आयुष्याला मिळालेली एक आगळीवेगळी कलाटणी असते की, जी तुमचे प्रारब्ध बदलून टाकते. तुमच्यासाठी कधी-कधी करिअर संधीचा दरवाजा खटखटवते. जेणेकरून, पुढचे आयुष्य सुखकारक होऊन जाते, परंतु प्रत्येकाच्या जीवनात करिअरच्या संधी सरळ मार्गाने आणि सोप्या पद्धतीने मिळतात असे नाही, तर कधी-कधी करिअर एक वादळ बनून येते. या वादळात तुम्ही बऱ्याच गोष्टी गमवू शकता, पण जेव्हा थंड डोक्याने विचार कराल, तेव्हा लक्षात येईल की, प्रत्येक संकट तुम्हाला करिअरची नवीन संधी मिळवून देते.करिअर निवडण्याआधीची पार्श्वभूमीकरिअर निवडण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. करिअर निवडण्याचे मार्ग जितके महत्त्वाचे, तितकेच करिअर निवडण्याआधीची पार्श्वभूमी जाणणे आणि माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. उदा. जर एखाद्या पिकाची लागवड करायची असेल, तर मातीचे/भूमीचे परीक्षण आधी करणे अनिवार्य असते. त्याचप्रमाणे, करिअर निवडायचे असेल, तर मार्केटमधील साधने वापरण्याआधी स्वत:चे, करिअरचे परीक्षण करणे आवश्यक असते. एक उदाहरण देते कोकणातील जमिनीबाबत. कोकणात आंबासुद्धा येतो आणि नारळही व दोन्ही फळांचे महत्त्व वेगवेगळे आहे. आता जर तुम्ही आंब्याचे कलम एका समुद्रकिनारी पाणथळ जागी लावायचा प्रयत्न केला, तर तिथे ते आंब्याचे झाड कुजून जाईल, तिथे नारळच लागणार आणि फळणार ... याच पद्धतीने बाजारात तुम्हाला लाखो करिअर पर्याय आणि त्याला निवडण्याची साधने मिळतील, पण तिथे फक्त पर्याय मिळतील, जे एखाद्या करिअरच्या कलमाप्रमाणे असतील. त्याची मदत घेऊन तुम्ही फक्त करिअरचे झाड लावू शकता, परंतु त्याला फळ येईल की नाही, याची काहीही हमी नाही. सर्व करिअर पर्याय हे उत्तमच असतात, पण त्या करिअर पर्यायांसाठी आपण किती योग्य आहोत, याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, म्हणून करिअर निवडण्याआधी आपली पार्श्वभूमी माहिती असणे आवश्यक आहे.हे करून पहातुमचा स्वभाव कसा आहे?तुमच्या आवडी-निवडी कोणत्या?तुमचे खरे गुण आणि दोष कोणते? कौटुंबिक वातावरण आणि त्याची तुमच्याशी असलेल्या अनुकूलतेचा टक्का?तुमचे सामर्थ्य आणि दुर्बलता कोणती?तुमच्यात कोणती कौशल्ये आणि त्रुटी आहेत?तुमचे व्यक्तिमत्त्व नक्की कसे आहे?तुमची मानसिकता कोणती?तुमचे ज्ञान आणि ज्ञानप्राप्तीची साधने ?तुमचा दृष्टिकोन कसा आहे?तुम्हाला आजवर किती संधी मिळाल्या आणि किती आव्हाने आलीत? किती संधींना तुम्ही यशात रूपांतरित केले?तुम्ही आजवर किती वेळा नियोजन केले आणि त्यात किती टक्के यशस्वी झालात?वरील बारा मुद्दे तुमच्या करिअरला समतोल करतात. म्हणून करिअर निवडण्याआधी वरील बाबी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींमुळे तुमचा जीवनाचा पाया मजबूत होतो. जेवढा मजबूत आणि खोल पाया, तेवढा मजबूत करिअरचा बंगला उभा राहू शकतो. उदा. जर तुम्ही उत्साही, थोडे रागीट, त्वरित निर्णय घेणारे, धाडसी असाल, तर तुम्ही एका इंजिनीयर किंवा लष्करी अधिकारी होऊ शकतात. त्याचप्रमाणे, तुम्हाला रंगसंगती, आकार, निसर्ग, नैसर्गिक सौंदर्य आवडत असेल, म्हणजे तुम्ही सर्जनशील व रचनात्मक व्यक्ती आहात आणि तुम्ही चांगले डिझाइनर, आर्किटेक, पेंटर किंवा एखादे सर्जनशील व्यक्ती होऊ शकता. अशाप्रकारे, तुम्ही बारा गोष्टींच्या मदतीने तुम्हाला जुळणारे करिअर निवडू शकता.तुम्ही आधीच करिअर निवडले असेल तर? मग पुढे काय? अशा वेळी आम्ही करिअर कंसल्टंट वापर करतो, तो रिवर्स इंजिनीअरिंगचा. यामध्ये तुम्ही जर आधीच करिअर निवडलेले असते आणि ते करिअर तुमच्यासाठी किती टक्क्यांनी जुळते हे ठरवता येते आणि काही त्रुटी असतील, तर त्या दूर करण्याचा मार्ग दाखवला जातो. त्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही घरीपण प्रयत्न करू शकता. दोन कागद घ्या. एका कागदावर तुम्ही निवडलेले करिअर आणि त्यासंबंधात बारा गोष्टी लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या करिअरची पार्श्वभूमी स्पष्ट होईल. नंतर दुसऱ्या कागदावर तुमच्या बारा गोष्टी लिहून काढा, म्हणजे तुम्हाला तुमचा पूर्ण अंदाज येऊन जाईल. आता सुरू करा... दोन्ही कागदांची तुलना. यामुळे तुम्हाला अंदाज येईल की, तुम्ही निवडलेल्या करिअरशी तुम्ही किती मिळते-जुळते आहात आणि किती पाऊल अजून दूर आहात. यामुळे तुम्हाला तुमचा स्वत:चा बिनचूक अंदाज येईल. मग काय पुढचे सर्व सोपे होऊन जाईल. मग एक गोष्ट मार्गी लागेल. ‘कमी तिथे तुम्ही!’ घरी नक्की प्रयत्न करून बघा, यश १०० टक्के मिळेल.असे निवडा पर्याय- नेहमी करिअरचे ३ पर्याय निवडा.- निवडलेल्या ३ पर्यायाचे स्वत:शी सेल्फ असेसमेंट किंवा रिव्हर्स इंजिनीअरिंग करून घ्या.- करिअरचे माइलस्टोन (प्रगती दर्शन) ठरवून घ्या. उदा. - १०वी - (३पर्याय) - एक पर्याय निवडा-१२वी/डिप्लोमा - ३ पर्याय - एक पर्याय निवडा- करिअर स्टेप्स लिहा आणि पूर्ण करा -- करिअर शैक्षणिक लक्ष्य ठेवून त्याची पूर्ती करा- करिअरमध्ये ध्येय ठरवा - धारणा बनवा - लक्ष्यभेदन करा- करिअरमध्ये प्रगतीचिन्ह ठरवा - बनवा आणि कौशल्य वाढवा (स्किल्स डेव्हलपमेंट).- करिअर नियोजन अचूक करा - जे शून्य ते अंतिम मुक्कामापर्यंत घेऊन जाईल.करिअरमधील गल्ल्या आणि थोडे शॉर्टकट- करिअर पार्श्वभूमीच्या १२ गोष्टी जाणून घ्या.- करिअरसंबंधी निगडित आय-क्यू, ई-क्यू, व्यक्तिमत्त्व कोड, मानसिकता यांचे परीक्षण करून घ्या.- करिअरच्या शून्यापासून अंतिम मुक्कामापर्यंत जाईपर्यंत १०० छोटे-छोटे लक्ष्य आणि ध्येय बनवून घ्या आणि एके क पूर्ण करत जा.वरील सर्व पावले जर तुम्ही योग्य पद्धतीने उचलली तर हमखास यश मिळेल आणि मिळालेले यश हे फक्त तुमचेच आहे.