शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेच्या शंभर जागा लढण्यासाठी सज्ज व्हा - रामदास आठवले

By admin | Updated: July 1, 2016 16:47 IST

पुढील वर्षाच्या प्रारंभी होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे शिवसेना भाजप रिपाइं महायुतीने एकत्र

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १ -  पुढील वर्षाच्या प्रारंभी होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे शिवसेना भाजप रिपाइं महायुतीने एकत्र महापालिकेच्या निवडणूका लढाव्यात यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. जर सेना भाजप एकत्र येणार नाहीत तर भाजप सोबत रिपब्लिकन पक्ष निश्चित युती करेल. मात्र युती होईल तेंव्हा होईल रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील निवडक शंभर जागा लढण्यासाठी तय्यारीला लागावे असे, आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी आज केले.  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी बांद्रा एम आय जी क्लब येथे रिपाइंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खासदार रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी गौतम सोनवणे उपस्थित होते.  विचारमंचावर तानसेन ननावरे एस एस यादव आशाताई लांडगे अभयाताई सोनवणे, सहदेव कटके, विवेक पंडित,  बाळासाहेब मिरजे, सिद्धार्थ कासारे, एम एस नंदा, वि ल मोहिते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना आणि रिपाइं ने महायुती करून एकजुटीने लढावे तसेच तिन्ही पक्षांची महायुती झाली तर रिपाइं ला 35 जागा देण्यात याव्यात तसेच महायुती झाली. नाहीतरी रिपाइंची भाजपसोबत निश्चित युती होणार असून त्यात रिपाइंला भाजपने 65 जागा द्याव्यात त्यासाठी निवडक शंभर जागा लढण्याची तयारी रिपाइं कार्यकर्त्यांनी करावी असा ठराव या बैठकीत करण्यात आला. अशी माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी जिल्हा आणि तालुका निहाय निरीक्षक नियुक्त करावेत कार्यकर्ता मेळावे घ्यावेत तसेच रिपाइं तर्फे आगामी पालिका निवडणुकीत मुस्लिम मराठा बौद्ध आणि मातंग सह सर्व समाजाचे कर्तृत्ववान उमेदवार रिपाइंच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे निर्देश खासदार रामदास आठवले यांनी दिले.   यावेळी रिपाइं चे जिल्हाध्यक्ष विवेक पवार, सो ना कांबळे, बाळासाहेब गरुड, सचिनभाई मोहिते, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.