शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक ऊर्जा मिळवा

By admin | Updated: February 12, 2017 00:31 IST

नीला सत्यनारायण : आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे कांचन परुळेकर यांना ‘कुुसुम पुरस्कार’

कोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आणि दु:खे असतात. त्यामुळे हे सगळं माझ्यासोबत का घडतंय असा विचार न करता घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींतून सकारात्मक ऊर्जा मिळवा, चौकटीबाहेर जाऊन प्रश्नांचा विचार करा. त्यातूनच उत्तरं मिळत जातात. जगण्याचा दृष्टिकोन बदलतो, असा कानमंत्र माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महिलांना दिला. शाहू स्मारक भवन येथे शनिवारी आंतरभारती शिक्षण मंडळाच्यावतीने कांचन परुळेकर यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुचेता कोरगावकर होत्या. रोख रुपये २५ हजार, शाल, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर सुचेता पडळकर, विनय पाटगावकर, पल्लवी कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे उपस्थित होते. नीला सत्यनारायण यांनी आपल्या कथांच्या माध्यमातून उपस्थित महिलांना जगण्याचा मूलमंत्र दिला. त्या म्हणाल्या, गृहिणी असलेल्या महिलांना बऱ्याच वेळा न्यूनगंड असतो. मात्र, स्त्रीने कुटुंबाचा सांभाळ करण्यास नकार दिला तर कुटुंब विस्कळीत होते. कांचन परुळेकर म्हणाल्या, महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढून त्यांच्या शक्तीचा वापर कुटुंबाच्या, समाजाच्या कल्याणासाठी करीत ‘स्वयंसिद्धा’ने त्यांना आत्मनिर्भर केले आहे. महिलांना राजकारणात आरक्षण मिळाले असले तरी ‘वहिनीसाहेबां’च्या वतीने ‘साहेब’च कारभार करतात. त्यामुळे महिलांना राजकीयदृष्ट्या साक्षर करणे गरजेचे आहे. सुचेता कोरगावकर यांनी समारोप केला. तनुजा शिपूरकर यांनी प्रास्ताविक, इंद्रायणी पाटील यांनी सूत्रसंचालन, तर एम. एस. पाटोळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शनिवारी नीला सत्यनारायण यांच्या हस्ते कांचन परुळेकर यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी सुचेता पडळकर, विनय पाटगावकर, सुचेता कोरगावकर, पल्लवी कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे उपस्थित होते.