शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डान्सबारला परवानगी मिळणे आता दुरपास्तच

By admin | Updated: April 20, 2016 05:44 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, राज्य सरकारने डान्सबारला परवानगी दिली असली तरी किती डान्सबारला परवानगी मिळेल, याबाबत साशंकताच आहे.

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, राज्य सरकारने डान्सबारला परवानगी दिली असली तरी किती डान्सबारला परवानगी मिळेल, याबाबत साशंकताच आहे. डान्सबारसाठी शासनाने ठरवलेल्या अटींची पूर्तता करणे अनेक बारमालकांना अशक्य होणार आहे. तर याच अटींची पूर्तता न करू शकलेल्या बारमालकांचे डान्सबारसाठी आलेल्या अर्जावर नवी मुंबई पोलिसांनी हरकत घेतली आहे.डान्सबारवरील बंदीविरोधात इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनने न्यायालयात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. परंतु डान्सबारसाठी परवाने देण्यापूर्वी अटींची पूर्तता करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यातील काही अटी वगळण्याची मागणी बारमालकांनी केल्याने काही अटी वगळण्यात आल्या असून, त्यामध्ये सीसीटीव्हीचाही समावेश आहे. यामुळे डान्सबारमधील नृत्याचे थेट पोलीस ठाण्यात प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वीच बंद झाले आहे. यानंतर राज्य सरकार कधी परवानगी द्यायला सुरू करतेय याकडे बारमालकांचे लक्ष लागले असले तरी किती जणांकडून अटींची पूर्तता होईल याबाबत साशंकताच आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेले बार रहिवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तर काही वाणिज्य गाळ्यामध्ये मात्र रहिवासी क्षेत्रातच आहेत. याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत असून, त्यांच्या तक्रारींनाही दाद मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे सुधारित नियमावलीनुसार डान्सबारसाठी परवाने देताना या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या याच अटींवर बोट ठेवत नवी मुंबई पोलिसांनी डान्सबारसाठी आलेल्या अर्जांवर आक्षेप घेतल्याचे समजते. नवी मुंबई पोलिसांचा हा अहवाल शासनाकडे गेल्यानंतर डान्सबार सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या त्या सर्वांचे अर्ज बाद होणार आहेत. अशाच प्रकारे राज्यातल्या अनेक प्रस्तावित डान्सबारवर पोलिसांचा आक्षेपार्ह ठपका बसणार आहे. त्यामुळे डान्सबार सुरूच करायचा असल्यास नवीन जागेत नियमानुसार फेरबदल करून बारमालकाला राज्य सरकारच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. त्याशिवाय राज्यात एकाही डान्सबारला परवानगी मिळणे कठीणच आहे. या संपूर्ण परिस्थितीवरून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत अटींच्या माध्यमातून बारमालकांची चांगलीच कोंडी केल्याचे दिसत आहे.