शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या प्रत्येक स्थितीची माहिती मिळणार

By admin | Updated: July 18, 2016 02:15 IST

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई मेट्रो वनच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाच्या केबलला एसएचएमएस (स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग यंत्रणा) यंत्रणा बसवण्यात आली

मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई मेट्रो वनच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाच्या केबलला एसएचएमएस (स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग यंत्रणा) यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे पुलाच्या प्रत्येक स्थितीची व हालचालींची इत्थंभूत माहिती मेट्रो प्रशासनाला मिळेल. मुंबईत अशी यंत्रणा प्रथमच बसवण्यात आली असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मुंबई मेट्रो तयार करताना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मेट्रोकडून पूल बांधण्यात आला. मात्र या पुलाला कोणत्याही खांबाचा आधार न देता तो संपूर्णपणे एअर केबलद्वारे बांधण्यात आला. कोणत्याही आधाराशिवाय मेट्रोचा पूल असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी मेट्रो प्रशासनाने एसएचएमएस ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. यात केबलला सेन्सर आणि अन्य यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पुलावर कायमस्वरूपी लक्ष ठेवतानाच त्याच्या प्रत्येक हालचालींची माहिती मेट्रोला मिळत जाईल. यात पूल किती व्हायब्रेट होत आहे, त्याला बसवण्यात आलेले नटबोल्ट व्यवस्थित आहेत की नाही, केबलला काही समस्या तर नाही ना, इत्यादी माहिती सेन्सरद्वारे देत राहील, असे मेट्रोच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)