कोल्हापूर : कोल्हापूरच्या अनिकेतने दुसऱ्यांदा जर्मनीची वारी करीत प्रथम जर्मनीतील स्थानिक संघ, आॅस्ट्रेलियन क्लब यांच्यासह आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत इराण, बहरीन, लेबनॉन या देशांविरुद्ध २८ गोल नोंदविले. त्याच्या या कामगिरीवर खुश होऊन जर्मनीतील प्रसिद्ध फँ्रकफर्ट क्लबने त्याला करारबद्ध करण्यासाठी गळ घातली. मात्र, त्याने केवळ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळण्याच्या इच्छेपोटी ही संधी नाकारली. अनिकेत प्रथम २०१४ मध्ये बार्यनमुनिच या संघाकडून १६ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी जर्मनीत गेला होता. त्याने संधीचे सोने करीत उत्कृष्ट खेळाडूचा ‘गोल्डन बुट’ पटकावला. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत शिक्षण घेत त्याने फुटबॉलचा सराव केला. तीन महिन्यांपूर्वी त्याची २०१७ साली होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. त्यानुसार भारतीय संघातील खेळाडूंचा दौरा पुन्हा जर्मनीमध्ये घेण्यात आला. त्यात त्याने जर्मनीतील डीएफआय, रोझनहॅम, रेडबुल, फॅँ्रकफर्ट, सालसबर्थ, वॉस्कर बॉधरनाईट, एफसी इंगोलस्टारसह अन्य स्थानिक संघांसोबत सामने खेळले. आॅस्ट्रेलियातील एका अकॅडमीसीही त्याला खेळण्याची संधी मिळाली. तसेच आशिया फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली. या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली.याशिवाय त्याला स्पेनमधील बिलारिया एफ.सी. या संघासोबत खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. यात प्रत्येक सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. सध्या तो १५ दिवसांच्या सुटीसाठी कोल्हापुरात आला आहे. मला अडीच महिन्यांच्या सरावादरम्यान जर्मनी, स्पेन, इराण, बहरीन, युरोप, आदी देशांच्या सर्वोत्कृष्ट संघाबरोबर खेळण्याची संधी मिळाली. मी स्वत: २८ गोल केले, तर इतरांना पास देऊन १५ गोल नोंदविण्यासाठी मदत केली. ही किमया केवळ जर्मन प्रशिक्षक निकोल अॅडम यांच्यामुळे शक्य झाली. माझ्या यशात छत्रपती मालोजीराजे, मधुरिमाराजे यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय वडील, आई कार्तिकी आणि संतोष हराळे यांचे सहकार्य माझ्यासाठी अनमोल आहे.- अनिकेत जाधव,फुटबॉलपटू१२ हजार डॉलर्सचे बूट भेटस्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी पाहून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ‘आदिदास’ या आंतरराष्ट्रीय ब्रँडचे १२ हजार डॉलर्स किमतीचे रिमॉन स्टड अर्थात स्टड खोलून काढता व जोडता येणाऱ्या बुटांचे चार जोड भेट दिले आहेत.
कोल्हापूरच्या ‘अनिकेत’ने गाजविली जर्मनी
By admin | Updated: October 8, 2015 00:33 IST