शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भूवैज्ञानिकांकडून होणार शहराचे सर्वेक्षण

By admin | Updated: August 10, 2014 00:09 IST

बुलडाणा नगरपालिका प्रशासनाचा निर्णय : आपत्तीच्या उंबरठय़ावरील वस्त्यांची नोंद

बुलडाणा : शहराच्या चारही बाजूंनी असलेल्या टेकड्या कोरून त्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोकादायक वस्त्यांचा भूवैज्ञानिक विभागाकडून सर्व्हे करून कायमस्वरूपी 'अँक्शन प्लॅन' तयार करण्यात येईल, अशी माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओव्हळ यांनी ह्यलोकमतशीह्ण बोलताना दिली. माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर 'बुलडाणा शहराला भूस्खलनाचा' धोका असे वृत्त 'लोकमतने' प्रकाशित करून शहरालगतच्या अशा धोकादायक वस्त्याकडे नगर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची पालिकेने लगेच दखल घेत जिल्हा भूवैज्ञानिक विभागाशी या संदर्भात चर्चा केली. सोमवार ११ ऑगस्ट रोजी भूवैज्ञानिक विभागाशी पत्रव्यवहार करून एका स्वतंत्र पथकाद्वारे बुलडाणा शहराच्या सीमारेषेवर असलेल्या टेकड्यांची पाहणी केल्या जाईल. या पाहणीतील निष्कर्षानंतर ज्या भागात धोकादायक स्थिती आढळून येईल तेथे अवैधरित्या घरे बांधून वस्ती केलेल्या लोकांचा पालिकेच्या वतीने स्वतंत्र सर्व्हे करण्यात येईल व आवश्यकता भासल्यास अशा ठिकाणची घरे दुसरीकडे हलविण्यात येतील. दरम्यान, लोकमतने या विषयावर प्रकाश टाकून आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दलही त्यांनी लोकमतचे आभार मानले.** माळीणची दुर्दैवी घटना ही इतर ठिकाणासाठी धोक्याची घंटा ठरलेली आहे. त्यादृष्टीने अशी घटना भविष्यात आपल्या शहरात घडू नये त्यासाठी उपाययोजना करणे हे पालिकेचे कर्तव्य आहे त्यासाठी आता नगरपालिका कठोर पावले उचलणार असल्याचेही मुख्याधिकारी ओव्हळ यांनी सांगितले. यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)** नगरसेवकांनाही देणार सूचनाशहरात रोजगारासाठी आलेल्या मजूर वर्गाने जागा मिळेल तेथे अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या अशा भागातील नगरसेवकसुद्धा नळ, लाईट व इतर सुविधा मिळण्यसाठी पालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्रासाठी आग्रही असतात. मात्र एखादी अप्रिय घटना घडली किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. हा धोका टाळण्यासाठी आशा धोकादायक ठिकाणी अवैधरित्या वस्त्या उभ्या राहत असल्यास अशा लोकांना नगरसेवकांनीसुद्धा प्रोत्साहन न देता प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशा सूचनाच आम्ही नगरसेवकांना देणार असल्याचे मुख्याधिकारी ओव्हळ यांनी सांगितले.