नजीर शेख - औरंगाबाद
शिवराज पाटील यांच्यानंतर सुमारे 35 वर्षाच्या कालखंडानंतर विधानसभेचे अध्यक्षपद हरिभाऊ बागडे यांच्या रूपाने मराठवाडय़ाला मिळाले आहे. महाराष्ट्राचा तसेच भारतीय जनता पक्षाचाही अस्सल भारतीय चेहरा असलेल्या हरिभाऊ बागडे यांची निवड तशी अपेक्षितच होती. अत्यंत साधी राहणी असलेले 69 वर्षीय हरिभाऊ बागडे यांच्या रूपाने एक चांगल्या प्रतिमेची व्यक्ती अध्यक्षस्थानी बसली आहे. मात्र, आज विधानसभा कामकाजाच्या पहिल्याच दिवशी भाजपाचे सरकार स्थापन करण्यासाठी घ्याव्या लागणा:या ‘आवाजी’ मतदानाच्या निर्णयाने त्यांच्यावर जोरदार टीकाही होऊ लागली आहे.
दहावीर्पयत शिक्षण झालेले बागडे यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. 197क् सालापासून जनसंघासोबत आणि नंतर भाजपाच्या सहवासात राहिलेले हरिभाऊ बागडे यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागच राहिले आहे. औरंगाबाद जिलतील तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून हरिभाऊ बागडे हे 1985 साली प्रथम विधानसभेवर निवडून गेले. युती सरकारमध्ये 1995 ते 1999 या काळात ते कॅबिनेट मंत्रीही राहिले. त्यावेळी त्यांनी रोहयो, फलोत्पादन, अन्न व नागरी पुरवठा आदी खात्यांचा कार्यभार सांभाळला. 2क्क्4 आणि 2क्क्9 साली मात्र बागडे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्याकडून दोन वेळा पराभव पत्करावा लागला. 2क्14 च्या निवडणुकीत मात्र डॉ. काळे यांच्यावर बागडे यांनी निसटता विजय मिळविला. यंदा त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची आधी अपेक्षा होती. मात्र, नंतर त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी भाजपाने निश्चित केले.
औरंगाबाद तालुक्यातील चित्तेपिंपळगाव हे बागडे यांचे गाव. 1958 पासून संघाचे स्वयंसेवक आहेत. 1967 ते 1972 र्पयत ते संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहिले. आणीबाणीच्या काळात जनमत जागृतीचे कामही बागडे यांनी केले. खा. पुंडलिक हरी दानवे तसेच आ. रामभाऊ गावंडे यांचे निवडणूक प्रचारप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. औरंगाबादेत सिंचन आणि सहकार क्षेत्रत त्यांचे उत्तम काम आहे. मतदारसंघात छत्रपती संभाजी हा साखर कारखाना आणि जिल्हा दूध संघाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. देवगिरी सहकारी बँकेच्या माध्यमातूनही त्यांचे कार्य आहे. भाजपा आणि संघाचा निष्ठावान कार्यकर्ता ही त्यांची अधिक चांगली ओळख आहे.
विधानसभा निवडणुकीत दोन वेळा पराभूत झाल्यानंतर भाजपामधील मुंडे-गडकरी वादात त्यांना ब:याच वेळा मानहानी पत्करावी लागली. मात्र, 2क्14 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष करून त्यांचा सन्मान राखला. आताही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव पुढे करून त्यांचा फडणवीस यांनी सन्मानच केल्याचे दिसत आहे.
धोतर आणि गांधी टोपी
सर्वसाधारणपणो कोणावरही जहरी टीका करणो किंवा अगदी टोकाची भूमिका घेणो हे बागडे यांच्या स्वभावात नाही. धोतर आणि पांढरा खादीचा शर्ट आणि डोक्यावर किंचित तिरकी असलेली गांधी टोपी हे हरिभाऊ बागडे यांचे वैशिष्टय़. एखाद्या कार्यक्रमप्रसंगी ते जाकीट घालतात. मराठवाडय़ात धोतर घालणा:या काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांच्याबरोबरीने बागडे यांचे नाव येते.
निवडून येण्यासाठी पैसा आणि दारू वाटणार नाही, भलेही मग निवडून नाही आलो तरी चालेल, अशी बागडे यांची ठाम भूमिका आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांचा उत्तम अभ्यास आणि जाण असणारे हरिभाऊ बागडे हे एकमेव नाव भाजपामध्ये दिसत आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना विधानसभेत न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फेसबुक पेजवरही बागडे
अस्सल ग्रामीण व्यक्तिमत्त्व असलेले हरिभाऊ बागडे यांनी काळाच्या बदलाप्रमाणो आपणही बदलात मागे नाही, हे वयाच्या 69 वर्षीही सिद्ध केले आहे. त्यांचे फेसबुक पेजही आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सोशल मीडियाचा जास्त बोलबाला झाला. अगदी ग्रामीण भागातही त्याचा मोठय़ा प्रमाणावर राजकीय कारणासाठी उपयोग होत असल्याचे दिसले. त्यामुळे हरिभाऊंनी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आपले फेसबुक पेज सुरू केले. त्यावर त्यांनी विविध कार्यक्रमांच्या तसेच आंदोलनाच्या पोस्ट टाकल्या आहेत.