शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

अस्सल कोल्हापुरी १५ किलोची चप्पल

By admin | Updated: April 27, 2015 03:28 IST

संपूर्ण राज्यात कोल्हापुरी चपलेची भारदार व रुबाबदार चप्पल म्हणून ख्याती असून, ती घालून चालताना होणाऱ्या कर्रकर्र आवाजामुळेच तिला नावलौकिक प्राप्त झाला आहे

राजीव लोहकरे, अकलूजसंपूर्ण राज्यात कोल्हापुरी चपलेची भारदार व रुबाबदार चप्पल म्हणून ख्याती असून, ती घालून चालताना होणाऱ्या कर्रकर्र आवाजामुळेच तिला नावलौकिक प्राप्त झाला आहे. फॅशनच्या जमान्यात अशा चपला वापरणारे आणि बनवणारे कमी झाले असले तरी माळशिरस तालुक्यातील आनंदनगर-अकलूज येथील बिभीषण राऊत याने १५ किलोची चप्पल बनवली असून, ती चक्क नऊ हजाराला विकलीबिभीषण राऊत यांच्या जोधपुरी व कोल्हापुरी पादत्राणे दुकानाचा नावलौकिक ऐकून सुळेवाडी येथील दाजी अनंता दोलतोडे यांनी राऊत यांच्याकडे वेगळी व आकर्षक अशा चपलेची मागणी नोंदवली़ दोलतोडे हे गेली २५ वर्षांपासून कोल्हापुरी चप्पलचे शौकीन असून, त्यांनी नेहमीच वजनदार कोल्हापुरी चपला वापरल्या आहेत. त्यामुळेच हटके चप्पल बनविण्याची आॅर्डर त्यांनी दिली. तब्बल महिनाभरानंतर १५ किलो वजनाची अस्सल कोल्हापुरी चप्पल साकारली गेली. चप्पलचे डिझाइन निवडल्यानंतर राऊत यांनी चप्पल बनविताना अडीच इंच जाडीची टाच, दीड इंच जाडीचा तळवा तयार करून एक फूट उंचीची रुबाबदार चप्पल तयार केली. हे करताना २४ नटबोल्टाबरोबरच लोखंडी नाल, फिरक्या, गोंडा, जर, वेणी, पितळी रिंगा, रिबीट, काचेच्या टिकल्यांचा वापर केला. चप्पलला तीन नागफण्या केल्या. त्याला मोत्यांच्या माळांनी सजवून बाजूंनी घुंगरांची जोड दिली, तर चपलेला घोड्याच्या टाचेची नाल वापरली. त्यामुळे चप्पल अधिकच आवाज करू लागली. ही चप्पल त्यांनी ९ हजार रुपयांस विकली.