शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

राज्यात ‘जेनरिक’ची दुकाने

By admin | Updated: September 19, 2015 03:35 IST

राज्यात लवकरच जेनरिक औषधांची २००पेक्षा अधिक दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो रुग्णांना स्वस्तात औषधे मिळू शकतील.

- यदु जोशी,  मुंबईराज्यात लवकरच जेनरिक औषधांची २००पेक्षा अधिक दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो रुग्णांना स्वस्तात औषधे मिळू शकतील. केंद्रीय औषधे व रसायने राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. पुढील महिन्यापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्याची योजना तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात चार-पाच राज्यांमध्ये सुरू झाली होती; पण ती फारशी यशस्वी झाली नाही. आजमितीस त्यातील १८९ दुकाने सुरू आहेत. या दुकानांबाबत आधी राहिलेल्या उणिवा दूर करीत नव्याने ही योजना राबविली जाणार आहे. महाराष्ट्रात अशी दुकाने केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुरू होत आहेत. केंद्राच्या ब्युरो आॅफ फार्मा या सार्वजनिक उपक्रमाचे संचालक (आॅपरेशन्स) कुलदीप चोपडा यांनी गेल्या आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळांमध्ये अशी दुकाने सुरू करण्यास तावडे यांनी सहमती दर्शविली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच जिल्हा सामान्य रुग्णालये आणि अन्य काही सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्येदेखील ही दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय, काही संस्थांनी आणि व्यक्तींनी ही दुकाने उघडण्याबाबत पुढाकार घेतला तर त्यांना सहकार्य केले जाईल, असे हंसराज अहीर यांनी स्पष्ट केले. या दुकानांमुळे औषधे ५० ते ७० टक्के स्वस्त मिळू शकतील. महाराष्ट्रात ती सुरू करताना जवळपास ५०० प्रकारची औषधे त्यात उपलब्ध असणार आहेत. त्यात औषधांबरोबरच सर्जिकल उपकरणांचाही समावेश असेल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही दुकाने महाराष्ट्रात सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. आता त्यासाठी राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहकार्य असेल, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. अनिल किल्लोर म्हणतात...जेनरिक औषधांचे खासगी दुकान मध्य भारतात पहिल्यांदा सुरू करणारे नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अनिल किल्लोर म्हणाले की, हा निश्चितच मोठा निर्णय आहे; पण याच दुकानांमध्ये खुल्या बाजारातील औषधांची विक्री करण्याची अनुमती सरकारने द्यायला हवी. तसे झाल्यास ही दुकाने व्यवहार्य ठरतील आणि सगळ्या प्रकारची औषधे रुग्णांसाठी मिळू शकतील.