शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य समभागधारकांना दिलासा नाही

By admin | Updated: July 11, 2017 05:44 IST

टाटा समूहाच्या सर्वसामान्य समभागधारकांनी केलेल्या प्रातिनिधिक दाव्यावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टाटा समूहाच्या सर्वसामान्य समभागधारकांनी केलेल्या प्रातिनिधिक दाव्यावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटविल्यानंतर त्याच दिवशी शेअर बाजारात टाटा समूहाचे शेअर्स गडगडले. त्यामुळे सर्वसामान्य समभागधारकांना ४१ हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला. आता ही नुकसानभरपाई टाटा समूहानेच करावी, अशी मागणी या प्रातिनिधिक दाव्याद्वारे केली होती.प्रमोद शहा व अन्य पाच जणांनी सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटविण्याच्या टाटा समूहाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मिस्त्री यांना बेकायदा व मनमानी करत अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आहे. तसेच २४ आॅक्टोबर रोजी मिस्त्री यांना पदावरून हटविल्यामुळे शेअर बाजारात टाटा समूहाच्या आठ कंपन्यांचे शेअर्सचे भाव गडगडले. त्यामुळे टाटा समूहानेच नुकसानभरपाई करावी, अशी विनंती दाव्यात करण्यात आली आहे.तत्पूर्वी या पाच समभागधारकांनी दिवाणी दंडसंहितेच्या नियम ८नुसार (एक किंवा त्याहून अधिक लोक न्यायालयाच्या परवानगीने प्रातिनिधिक दावा दाखल करू शकतात) दावा दाखल करण्याची परवानही मागितली होती. डिसेंबरमध्ये न्या. एस. जे. काथावाला यांनी या याचिकाकर्त्यांना प्रातिनिधिक दावा दाखल करण्याची परवानगी दिली होती. मात्र सोमवारी न्या. एस. सी. गुप्ते यांनी हा दावा फेटाळला. ‘काही सर्वसामान्य समभागधारकांनी दाखल केलेल्या दाव्याला ‘प्रातिनिधिक दावा’ म्हटले जाऊ शकत नाही,’ असे न्या. एस. सी. गुप्ते यांनी स्पष्ट करत दाव्यावरील सुनावणीस नकार दिला.