शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ब्लू-टूथच्या साह्याने परीक्षा देणारा गजाआड

By admin | Updated: January 1, 2016 00:06 IST

यवतमाळ जिल्हा तलाठी भरती परीक्षेत डमी उमेदवाराने मोबाइलच्या मदतीने औरंगाबादेतील ‘मास्टर माइंड’ला प्रश्नपत्रिका पाठविली अन् हेडफोनवरून मिळणारी उत्तरे तो उतरवत होता,

औरंगाबाद : यवतमाळ जिल्हा तलाठी भरती परीक्षेत डमी उमेदवाराने मोबाइलच्या मदतीने औरंगाबादेतील ‘मास्टर माइंड’ला प्रश्नपत्रिका पाठविली अन् हेडफोनवरून मिळणारी उत्तरे तो उतरवत होता, पण मध्येच मोबाइलचा ‘स्पीकर’ आॅन झाला आणि त्याचे बिंग फुटले.पुसद येथील श्रीराम आसेगावकर विद्यालय या परीक्षा केंद्रावर रविवारी हा प्रकार घडला. दुसऱ्याच्या नावाने परीक्षा देणाऱ्या करणसिंग धरमसिंग जारवाल (२२) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या मोबाइलमध्ये ‘आर. आर.’ या नावाने ‘सेव्ह’ केलेल्या क्रमांकावरून औरंगाबादेतून कोण उत्तरे देत होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.राहुल गोपीचंद गुसिंगे (२२, रा. राजेवाडी, जि. जालना) या उमेदवाराच्या नावावर करणसिंग परीक्षा देत होता. औरंगाबादेतील पवनसिंग फकीरचंद बहुरे याच्यामार्फत राहुलने तलाठी परीक्षेसाठी करणसिंगला तयार केले. त्यासाठी राहुलच्या प्रवेशपत्रावर करणसिंगचे छायाचित्र लावण्यात आले. त्यानंतर पवनसिंगने परीक्षेच्या आदल्या दिवशी एका खासगी वाहनाने करणसिंगला पुसदला आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. असा झाला पर्दाफाशकेंद्राध्यक्ष व पुसदचे तालुका कृषी अधिकारी पी. एन. राठोड परीक्षा केंद्रातून फेरफटका मारत होते. करणसिंग जवळून जात असताना त्यांना मोबाइलच्या ‘की पॅड’चा आवाज आला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले, परंतु दुसऱ्या वेळीदेखील असाच प्रकार घडल्याने राठोड यांना संशय आला. त्यांनी करणसिंगवर पाळत ठेवली.मोबाइलच्या माध्यमातून करणसिंगने सव्वातीन वाजताच प्रश्नपत्रिका औरंगाबादेत पाठविली होती. संबंधित व्यक्तीकडून उत्तरे मिळविण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, ब्लू-टूथ सुरू करण्याचे बटन दाबण्याऐवजी त्याने ‘स्पिकर’चे बटन दाबल्याने उत्तरे सांगणाऱ्या व्यक्तीचा आवाज केंद्रात घुमला आणि हा प्रकार उघडकीस आला.राहुल गुसिंगे बनून परीक्षेला जाण्यापूर्वी करणसिंग जारवालने एकावर एक, असे दोन बनियन घातले होते. एकावर ब्लूटूथ चिकटपट्टीने चिटकविले आणि त्याची वायर बनियनच्या शिलाईमध्ये लपविली. मोबाइल पँटच्या खिशात ठेवला, अशाप्रकारे तयारी करून तो दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणाऱ्या परीक्षेसाठी केंद्रावर गेला.