शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसावर हल्ला करणारे आरोपी गजाआड

By admin | Updated: October 20, 2016 22:08 IST

वाहतूक पोलिसांवर हल्ला करून एकाला गंभीर दुखापत करणा-या आरोपी बापलेकाला पोलिसांनी अटक केली.गुणवंत वामनराव तुमसरे (वय ५०) आणि शूभम गुणवंत तुमसरे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २० : वाहतूक पोलिसांवर हल्ला करून एकाला गंभीर दुखापत करणा-या आरोपी बापलेकाला पोलिसांनी अटक केली.गुणवंत वामनराव तुमसरे (वय ५०) आणि शूभम गुणवंत तुमसरे (वय २२) अशी त्यांची नावे आहेत. ते अंबानगर, मानेवाडा (बेसा रोड) येथे राहतात. त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई राहूल अरुणराव खळतकर (वय ३०, रा. अयोध्यानगर, साईमंदीराजवळ) हे बुधवारी रात्री ८.३० वाजता रामचंद्र नानाजी रोहणकर (हवलदार) यांच्या सोबत मानेवाडा चौकाजवळ कर्तव्य बजावत होते. तेथे गुणवंत तुमसरेचा संशय आल्याने खळतकर आणि रोहनकर या दोघांनी त्यांच्यावर ड्रंक न ड्राईव्हची कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू केली. त्यावरून गुणवंत यांचा पोलिसांशी वाद सुरू झाला. गुणवंत यांनी फोन करून मुलगा शूभमला ही माहिती दिली. शूभम आपल्या तीन साथीदारांसह तेथे आला. तुमसरे बापलेक आणि त्यांच्या तीन साथीदारांनी पोलिस कर्मचा-यांशी वाद घातला. प्रकरण बाचाबाचीवर आले. त्यानंतर पोलिसांजवळची काठी हिसकावून गुणवंत यांनी राहूल खळतकरच्या डोक्यावर मारली. रक्तबंबाळ खळतकरसोबतच आरोपींनी रोहनकरचीही धुलाई केली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. जखमी पोलिसांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिका-यांनी धाव घेतली.

रोहनकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी तुमसरे बापलेक आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवुन अश्लिल शिवीगाळ करणे प्राणघातक शस्त्रानीशी हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तुमसरे बापलेकाला अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्षनागरिकांशी सौजन्याने बोला, त्यांच्याशी वाद घालू नका, अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून पोलीस कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे पोलीस कर्मचारी साफ दुर्लक्ष करताना आढळतात. ठाण्यात असो की रस्त्यावर, पोलीस नागरिकांशी अत्यंत उर्मटपणे बोलतात. त्यातून वाद सुरू होतो. थोडे कमी जास्त झालले की शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली जाते. यातूनच हे वाद घडतात. गुंड प्रवृत्तीची मंडळी पोलिसांवर हल्ले करतात. महिनाभरापूर्वी कॉटन मार्केटजवळ एका दारूड्या वाहनचालकाने असाच हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले होते. तर, आता महिनाभरात ही दुसरी घटना घडडली