शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गवळीला १४ दिवसांची ‘फर्लो’

By admin | Updated: March 3, 2016 04:54 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी यास कुटुंबाच्या भेटीसाठी उच्च न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची फर्लो (संचित रजा) मंजूर केली.

नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी यास कुटुंबाच्या भेटीसाठी उच्च न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची फर्लो (संचित रजा) मंजूर केली. गवळीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २८ दिवसांच्या फर्लोसाठी अर्ज करण्यात आला होता, परंतु फर्लोच्या मुदतीचे अधिकार न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने कारागृह प्राधिकाऱ्यांकडे सोपविले. प्राधिकाऱ्यांनी गवळीला १४ दिवसांची रजा मंजूर केली.गवळीने कारागृह अधीक्षकांकडे फर्लोची मागणी केली होती, परंतु त्याची मागणी फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वीही त्याने मे २०१५ मध्ये उच्च न्यायालयामार्फत मुलाच्या लग्नासाठी पॅरोल (अर्जित रजा) मंजूर करून घेतला होता. आईच्या आजाराचे कारण पुढे करून त्याने ही रजा वाढवून घेतली होती.साकीनाका भागातील भूखंडाच्या प्रकरणात ३० लाखांची सुपारी घेऊन अरुण गवळी आणि टोळीने मार्च २००८मध्ये घाटकोपर येथील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. विशेष मोक्का न्यायालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये गवळी आणि अन्य ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. प्रारंभी गवळीला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथून त्याला नागपूरच्या कारागृहात स्थानांतरण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)