शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’च्या अध्यक्षपदी गौतम चटर्जी

By admin | Updated: May 19, 2017 00:33 IST

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)च्या अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव गौतम चटर्जी

- अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)च्या अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. विजय सतबीरसिंग यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे निवृत्त होण्याआधीच त्यांच्यासाठी पुढचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायपालिकेतून बी.डी. कापडणीस यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.चटर्जी यांची अध्यक्षपदी निवड होणार हे वृत्त सगळ्यात आधी लोकमतने २४ आॅक्टोबर २०१६ रोजी दिले होते. चटर्जी यांना हाउसिंग रेग्यूलेटर म्हणून नियुक्तीसाठीच्या कायदेशीर अडचणींवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात गृहनिर्माणविषयक बाबींचा सल्ला देण्यासाठी विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमले होते. केंद्राच्या कायद्यात हाउसिंग रेग्यूलेटर म्हणून नेमलेली व्यक्ती सध्या गृहनिर्माणविषयक बाबी हाताळणाऱ्या व्यक्तीलाच प्राधिकरणाचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमता येईल, अशी अट होती. चटर्जी परिवहनचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते. नव्या नियमानुसार अडचण येऊ नये म्हणून त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात गृहनिर्माणविषयक बाबींसाठीचे विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमले गेले. या पदासाठी तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय इच्छुक होते. त्यामुळेच नेमणुकीची फाइल रखडली गेली. क्षत्रिय यांना सेवा हमी कायद्याचे आयुक्त म्हणून नेमले गेल्याने चटर्जी यांचा मार्ग मोकळा झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदस्यपदासाठी तीन नावे होती. त्यातील दोन अधिकारी थेट आयएएस नव्हते. तिसरे नाव विद्यमान प्रधान सचिव विजय सतबीरसिंग यांचे होते. ते जुलैमध्ये निवृत्त होतील. त्यांची यात निवड झाल्याने निवृत्तीनंतर शासकीय जागा मिळविण्यात आयएएस अधिकाऱ्यांचे वर्चस्व कायम राहिले. प्राधिकरणाच्या अध्यक्षांना पद स्वीकृतीपूर्वी शासनाच्या गृहनिर्माण विभागाचे मंत्री यांच्यासमोर पद व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागेल.