शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गौरींचे पारंपरिक पद्धतीने आगमन

By admin | Updated: September 9, 2016 02:00 IST

गौराई आली, सोना-मोत्यांची पावलांनी आली, सुखसमृद्धी घेऊन आली,’ असे म्हणत वाजत-गाजत अत्यंत पारंपरिक पद्धतीने गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले.

पुणे : ‘गौराई आली, सोना-मोत्यांची पावलांनी आली, सुखसमृद्धी घेऊन आली,’ असे म्हणत वाजत-गाजत अत्यंत पारंपरिक पद्धतीने गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. मुखवट्यांसह उभ्या आणि खड्याच्या गौरी विविध सजावटींसह घरात विराजमान झाल्या. दिवसभर गौरींच्या आगमनासाठीचा शुभ मुहूर्त असल्याने नोकरदार महिलांना चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळनंतर गौरी बसविण्याला महिलांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. दर वर्षी घरी गणपतीचे आगमन झाल्यानंतर पाचव्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे स्वागत केले जाते. अनुराधा नक्षत्रावर पूजन, तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. काही घरांत गौरींनाच महालक्ष्मी असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून त्याला ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी (शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवितात.काही घरांत नवसाने बोललेले गौरींचे बाळदेखील मांडतात. पावलांच्या रांगोळ्या, हळदी-कुंकवाच्या सड्यावरून वाजत-गाजत आणतात, गौराईला सोन्या-मोत्याच्या पावलांनी आणले जाते. पहिल्या दिवशी तिला दुर्वा, कापूस, आघाडा वाहतात आणि मेथीची भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवतात. दुस-या दिवशी तिला पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात; तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो. तिसऱ्या दिवशी तिला खीर-कानवल्याचा (करंजीचा प्रकार मुरड घालून करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवून तिची पाठवणी (विसर्जन) करतात. अशाप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते व परत येण्याचे वचन देऊन जाते. (प्रतिनिधी)