शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

हिरावाडीतून गौन खनिजाची वाहतूक

By admin | Updated: May 6, 2014 15:23 IST

नागरीक त्रस्त : कारवाईची मागणी

नागरीक त्रस्त : कारवाईची मागणी पंचवटी : स्व. मीनाताई ठाकरे क्रिडा संकुल ते तारवालानगरला जोडल्या जाणार्‍या हिरावाडीतील मुख्य रस्त्यावरून सध्या गौन खनिजाने भरलेल्या चारचाकी अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. गौन खनिजांची वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे ध्वनीप्रदुषण मोठया प्रमाणात वाढले असुन अपघातात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले असुन अवजड वाहनांची वाहतूक करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी हिरावाडीतील नागरीकांनी केली आहे. महामार्ग ते दिंडोरीरोडला हिरावाडीचा रस्ता जोडला जातो त्यामुळे या रस्त्याने दिवसभर खडी, वाळू, विटा तसेच इंधनाने भरलेली वाहने जात असतात. दिवसभर या वाहनांची वर्दळ सुरू राहत असल्याने रस्त्याने येजा करणार्‍या महिलांना विशेषत: ज्येष्ठ नागरीकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. गौन खनिजाने भरलेली वाहने तर रस्ता मोकळा दिसत असल्याने शंभराचा स्पीड ओलांडून वाहने नेतात त्यामुळे रस्त्यावरची धूळ तर उडतेच शिवाय ध्वनीप्रदुषण होत आहे परिणामी नागरीक चांगलेच त्रस्त झाले असुन या अवजड वाहतुकीला कोण आळा घालणार असा सवाल नागरीकांनी केला आहे. वाहतूक शाखेकडे अनेकदा तक्रार करूनही त्याचा उपयोग होत नसल्याने वाहतूक शाखेच्या कारभारावर नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर) इन्फो बॉक्सगौन खनिजाची चोरटी वाहतूकस्व. मिनाताई ठाकरे क्रिडा संकुल ते तारवालानगर हा दिंडोरीरोडला जोडला जाणारा मुख्य मार्ग आहे. हिरावाडीतून गौन खनिजाने भरलेली वाहतूक दिवसभर सुरू असली तरी यातील अनेक वाहनात क्षमतेपेक्षा जास्त गौन खनिज भरलेले तर असतेच शिवाय काही वाहने मुख्य रस्त्याने न जाता नागरी वसाहतीतील छोटया रस्त्याने मार्ग काढत असल्याने गौन खनिजांची चोरटया पद्धतीने वाहतूक केली जात असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे.