शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

फाटक यांचा राणेंना धक्का

By admin | Updated: July 20, 2014 01:15 IST

ठाण्यातील कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांनी सात नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करून त्यांना मोठा धक्का दिला आह़े

नारायण जाधव - ठाणो
घर फिरले की, घराचे वासे फिरतात, असे म्हटले जात़े त्याचा प्रत्यय आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांना येत असून, त्यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताच त्यांचे ठाण्यातील कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांनी सात नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करून त्यांना मोठा धक्का दिला आह़े मुंबईतील श्रीकांत सरमळकर यांच्यापाठोपाठ आता ठाण्यातील फाटक यांच्याही हातात शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंनी सोमवारी राणो त्यांचा पर्दाफाश करण्याआधीच प्रहार केला आह़े 
नारायण राणो शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर रवींद्र फाटक यांनी त्यांना सावलीसारखी साथ दिली होती. या निष्ठेचे फळ म्हणून मागील विधानसभा निवडणुकीत राणोंनी फाटक यांना कणकवलीत काँग्रेसचे तिकीट मिळवून दिले होते. 
मात्न, त्यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता़ त्यानंतरही फाटक राणोंसोबतच होते. मात्न, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता़
अशातच अजून अनेक राणो  समर्थक शिवसेनेच्या वाटय़ावर असल्याचे शिवसेना नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले 
आह़े
मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांतील अनेक समर्थक हात सोडून जाऊ लागल्याने राणो यांना विधानसभा निवडणुकीआधीच धक्के बसत आहेत़ फाटक यांच्यासारखा पैसा खर्च करणारा मोहरा गळाला लागल्याने मातोश्रीने ठाण्यातील नुसत्या नावानेच मोठय़ा असलेल्या परंतु पैसा खर्च करण्यात आखडता हात घेणा:या ‘अनंत’ नरेशांची नाराजी पचवून फाटक यांच्यासाठी पायघडय़ा पसरल्या आहेत़ यामुळे उद्या कदाचित त्यांना राजन विचारेंच्या ठाणो शहर मतदारसंघातून शिवसेनेकडून मैदानात उतरवले जाऊ शकत़े 
ठाण्यातील काँग्रेसचा एकमेव थैलीशहा म्हणून फाटक परिचित होते. काँग्रेसचा ठाण्यातील कुबेरच गेल्याने त्या पक्षाची शहरात आणखी वाताहत होऊ शकत़े शिवसेनेने आगामी महापौरपदासह महापालिकेतील सर्व पदांची दावेदारी आणखी मजबूत केली आहेच, शिवाय महापालिकेतील टक्केवारी आणि ठेकेदारीचे आपले राजकारण सोपे केले आह़े
राजा गवारीसारखा विटावा भागातील नगरसेवक खेचून शिवसेनेने कळवा-मुंब्रा भागातील आपली 
ताकद आणखी मजबूत केली 
आह़े मागे, मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या नाराज नगरसेवकांसह मनसे-शिवसेना नगरसेवकांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याची भाषा केली असतानाच आता गवारीसारखा काँग्रेसमधील भाई गळाला लावून शिवसेनेने 
आव्हाड यांचीही डोकेदुखी वाढवली आह़े
 
वाहनचालक ते स्थायी समिती सभापती
च्ठाण्यातील स्व़ आनंद दिघेंचा वाहनचालक असलेल्या फाटक यांची राजकीय कारकीर्द मोठी मनोरंजक आह़े ठाणो शहरात दिघेंनी अनेकांना आपल्या जादुई करिश्म्याने मोठे केल़े नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री केल़े अशांपैकी फाटक एक आहेत़ 
 
च्वाहनचालक म्हणून फाटक यांनी दिघेंची मर्जी संपादन केल्याने ते नगरसेवक झाल़े नगरसेवक झाल्यानंतर कोकणी माणूस म्हणून नारायण राणो यांच्याजवळ गेल़े राणो मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईत कालिदास कोळंबकर आणि ठाण्यात रवींद्र फाटक हे त्यांचे ‘खास माणूस’ म्हणून परिचित झाल़े याच जोरावर ते बिल्डर म्हणून नावारूपास आल़े 
च्महापालिकेतील सत्तासोपानाच्या लढाईत मध्यंतरी त्यांच्या गळ्यात स्थायी समिती सभापतीपदाची 
माळही आली होती़ सभापती म्हणून कोपरी-पाचपाखाडीत त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत़ 
 
निष्ठावंतांना डावलून गद्दारांना शिवसेनेने दिला प्रवेश
अजित मांडके ल्ल ठाणो
ज्या गद्दारांनी शिवसैनिकांना मारहाण केली, लाथाबुक्क्या घातल्या, शिवसेनेवर जहरी टीका केली, त्याच गद्दारांसाठी शिवसेनेने पुन्हा पायघडय़ा घातल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे. ठाण्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा विरोध डावलून रवींद्र फाटक यांच्यासह त्यांच्या सहका:यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने निष्ठावान शिवसैनिक पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. 
कोपरी-पाचपाखाडी भागातील प्रभाग क्र. 34 ब चे नगरसेवक आणि काँग्रेसचे गटनेते तसेच नारायण राणो यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे रवींद्र फाटक यांनी आपली पत्नी जयश्री फाटक, दीपक वेतकर, मीनल संखे, राजा गवारी, कांचन चिंदरकर, मनजित कौर या नगरसेवकांसह माजी नगरसेवक शैलेश सावंत आणि मधुकर होडावडेकर यांच्यासह शेकडो पदाधिका:यांसमवेत शनिवारी सकाळी मातोश्रीवर ठाणो जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मागील महिनाभर फाटक हे शिवसेनेत जाणार, अशी चर्चा ठाण्यात रंगत होती. परंतु, ठाण्यातील काही ज्येष्ठ आणि निष्ठावान शिवसैनिकांनी याला विरोध केला होता. फाटकांचे द्वार या शिवसैनिकांनी रोखून धरले होते. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर याच निष्ठावंतांनी माघार घेऊन फाटकांसाठी शिवसेनेचे द्वार खुले करून दिले आणि अखेर शनिवारी त्यांनी हा प्रवेश केला.