शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर टँकर उलटल्याने गॅसगळती

By admin | Updated: May 15, 2016 05:01 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटालगत चिंतामणवाडी गावाजवळ सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर उलटला. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प होती.

कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटालगत चिंतामणवाडी गावाजवळ सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर उलटला. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प होती. या गॅस टॅँकरमधून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅसगळती सुरू झाली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडील तीन ते चार किमीपर्यंतची सर्व हॉटेल्स, ढाबे बंद ठेवण्यात आली. दरम्यान, गळती आटोक्यात आणल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. तरीही या मार्गावरील वाहतूक पुन्हा तासभर ठप्प झाली होती. मुंबईहून नाशिककडे भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस घेऊन जाणारा टॅँकर भरधाव वेगात कसारा घाटाच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळला. सुरुवातील गॅसगळती होत नसल्याने संबंधित यंत्रणांनी एकेरी वाहतूक सुरू करून गॅसगळती झाल्यास त्यासाठी उपाययोजना करणारी यंत्रणा, अग्निशामक दल, रुग्णवाहिका व पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दीड वाजण्याच्या सुमारास अचानक गॅसगळती सुरू झाली. यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक पूर्णत: थांबवून दोन्ही बाजूंकडील तीन ते चार किमी अंतरावरील हॉटेल्स, ढाबे पूर्णत: बंद केले. तसेच काही गावे अंशत: खाली केली. (वार्ताहर)१चिंतामणवाडी गावाजवळच गॅस टँकर उलटला होता. या गावात सुमारे १०० घरांची वस्ती असून, जर गॅसगळती वाढून अपघात झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. गॅसगळती व गावात सुरू असलेल्या चुली यामुळे मोठा प्रसंग ओढवला असता. २शासकीय यंत्रणेने दाखविलेल्या तत्परतेमुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, अतिदक्षता म्हणून पोलिसांनी लगतची गावे, पाडे, हॉटेल्स, ढाबे यात ज्वलनशील पदार्थ कार्यान्वित करण्यास मनाई केली होती.