शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

गॅस सिलिंडर स्फोटात तिघे गंभीर

By admin | Updated: February 10, 2017 22:59 IST

शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस कारंडे मळा येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर टाकीमधून लहान सिलिंडर टाकीत बेकायदेशीर गॅस भरताना स्फोट होऊन

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 10 -  शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस कारंडे मळा येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर टाकीमधून लहान सिलिंडर टाकीत बेकायदेशीर गॅस भरताना स्फोट होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले. यावेळी घरासह रिक्षाला आग लागून सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. जखमींमध्ये शशिकांत तोलाराम आहुजा (वय ५०), त्यांचा मुलगा सनी (२६), कामगार दत्तात्रय बापू गुरव (२२, रा. बहिरेश्वर, ता. करवीर) यांचा समावेश असून त्यांना न्यू शाहूपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. गुरव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन-अडीच किलोच्या सत्तर गॅस सिलिंडरच्या टाक्या जप्त केल्या तसेच संशयित आरोपी शशिकांत आहुजा याला रात्री उशिरा अटक केली. अधिक माहिती अशी, शशिकांत आहुजा यांचे शिवाजी चौकात गॅस शेगडीचे दुकान आहे.  शासकीय विश्रामगृहाच्या पिछाडीस कारंडे मळा येथे घर आहे. घरासमोरील रिकाम्या जागेतील गोडाऊनमध्ये ते त्यांचा मुलगा व कामगार असे तिघेजण घरगुती वापराच्या दोन सिलिंडरमधील गॅस दोन ते अडीच किलोच्या लहान सिलिंडर टाकीत भरत होते. काही सिलिंडर टाक्यांमध्ये गॅस भरून त्या रिक्षामध्ये ठेवल्या होत्या. त्यांच्या शेजारीच ते गॅस भरत होते. यावेळी अचानक लहान सिलिंडर टाकीचा स्फोट होऊन आग लागली. त्यामध्ये भाजून तिघेही गंभीर जखमी झाले. स्फोटाचा आवाज ऐकून आहुजांच्या घरातील सर्वजण बाहेर पळत आले. गॅस आजूबाजूला पसरून घराला व रिक्षाला आग लागली. यावेळी आहुजा कुटुंबीयांनी घरातील पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यानंतर तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. आजूबाजूला भर नागरी वस्ती आहे. आग तत्काळ विझवली नसती तर मोठी हानी झाली असती. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न शशिकांत आहुजा यांच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर गॅस भरून विक्री केल्याप्रकरणी जुना राजवाडा व शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. घरासमोरील गोडावूनमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचू नये, यासाठी त्यांनी आगीची वर्दी अग्निशामक दलास दिली नाही. कोणताही गाजावाजा न करता घरातील पाण्याने आग विझवली. त्यानंतर तिघेही दुपारी दोनच्या सुमारास सीपीआरमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने शाहूपुरी पोलिसांना फोनवरून वर्दी कळविली. त्यामध्ये पितळी गणपतीजवळ गॅस शेगडी दुरूस्त करताना स्फोट होऊन तिघेजण जखमी झाले होऊन उपचारासाठी दाखल झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोन बीटमार्शल रुग्णालयात जबाब घेण्यासाठी गेले. याठिकाणी जखमींनी रुग्णालय प्रशासनासह पोलिसांपासून घटना लपविण्याचा प्रयत्न केला. खबऱ्याने दिली टीप शाहूपुरी हद्दीतील खबऱ्याने पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांना फोन करून आहुजा यांनी पोलिसांना दिलेली माहिती खोटी असून त्यांच्या घरी गॅसचा स्फोट झाल्याचे सांगितले. त्यावर चौगुले यांनी गुन्हे शाखेच्या सहकाऱ्यांना घेऊन आहुजा यांचे घर गाठले. पाहतात तर घरासह रिक्षा पेटली होती. खिडक्यांचे लोखंडी गज वितळून गेले होते. घराच्या बाजूलाच ट्रक व कार लावली होती. या दोन्ही वाहनांची पाहणी केली असता सुमारे दोन मोठे व सत्तर लहान टाकीचे सिलिंडर मिळाले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शशिकांत आहुजा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांचे दुर्लक्ष शासकीय विश्रामगृहाच्या मागे बिनदिक्कत बेकायदेशीर गॅस भरून त्याची विक्री होत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना नव्हती का? आहुजा हा पोलिस रेकॉर्डवर आहे. त्याच्या हालचालींवर पोलिसांची नजर होती की जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात होते, अशी चर्चा नागरिकांतून आहे.