शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

यात्रांमध्ये गजबजले कुस्त्यांचे आखाडे!

By admin | Updated: May 4, 2017 02:15 IST

पुणे जिल्ह्यामध्ये यात्रांचा हंगाम उत्साहात पार पडला असून बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी असली तरी गावोगावी यात्रा कमिट्यांनी कुस्त्यांचे

तुषार मोढवे / चासकमानपुणे जिल्ह्यामध्ये यात्रांचा हंगाम उत्साहात पार पडला असून बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी असली तरी गावोगावी यात्रा कमिट्यांनी कुस्त्यांचे आखाडे भरवून यात्रांमध्ये रंगत आणली! बैलगाडाशौकिनांनीही दुधाची तहान ताकावर भागवत कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी आखाड्यांमध्ये गर्दी केली. दिवाळी संपली, की पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू होतो तो अगदी वैशाख शुद्ध द्वितीयापर्यंत चालू राहतो. या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये परंपरेनुसार आपल्या ग्रामदैवताची यात्रा उत्साहात साजरी केली जाते. यात्रेनिमित्त शहरांमध्ये गेलेले चाकरमानी आवर्जून कुटुंबासह गावी येतात, ग्रामदैवत, कुलदैवताचे दर्शन घेतात आणि पारंपरिक यात्रा उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. यात्रा म्हटलं, की बैलगाड्यांच्या शर्यती, भारुड, तमाशा यांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा आणि पुन्हा रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे साधारण उत्सवाचे स्वरूप असते. यात्रेनिमित्त पाहुण्यांना, मित्रमंडळींना आवर्जून स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले जाते. गावांमधील बैलगाडाशौकीन दिवसभर घाटामध्ये शर्यती पाहायच्या आणि पाहुण्यांच्या घरी जाऊन भोजन करायचे, वेळ असला तर रात्री भारुड किंवा तमाशा पाहायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या गावी जायचे असा पूर्वीचा कार्यक्रम असे. परंतु आता बैलगाड्यांच्या शर्यती बंद असल्याने गावोगावच्या यात्रांची गर्दी कमी झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी बैलांची गावातून मिरवणूक काढून ग्रामदैवताची पालखी काढणे व हारतुरे करणे एवढेच काम राहिले आहे. मात्र बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्या तरी यात्रा आयोजकांनी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. नुकताच कुस्ती या खेळावरील आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट येऊन गेल्याने ग्रामीण भागात पुन्हा कुस्तीचे पर्व सुरू झाले आहे. यात्रांमध्ये आखाड्यामध्ये आता गावोगावच्या प्रसिद्ध मल्लांना आमंत्रित करून त्यांच्या निकाली कुस्त्या लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसेही ठेवण्यात येत आहेत. राज्यपातळी, देशपातळीवरील विविध कुस्ती स्पर्धांमधील विजेत्या, उपविजेत्या मल्लांना आमंत्रित करून त्यांचीही कुस्ती खेळवली जात आहे. त्यामुळे कुस्तीशौकिनांची संख्या वाढली.कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, अहमदनगर या जिल्ह्यांमधून नामांकित मल्ल मोठ्या गावांच्या यात्रांमध्ये हजेरी लावू लागले आहेत. त्यामुळे लहान मुले व युवकांमध्येही कुस्तीच्या खेळाबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे.अनेक गावांमधून पालक आपल्या मुलांना एक-दोन महिने कोल्हापूरच्या तालमींमध्ये पाठवू लागले आहेत. ग्रामीण भागामध्ये हळूहळू लोप पावत चाललेल्या या खेळाला यात्रांमध्ये मिळत असलेल्या प्रतिसादामुळे पुन्हा जीवदान मिळाले आहे.