शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कचरा साठतो २०० ठिकाणी

By admin | Updated: June 27, 2016 01:02 IST

शहरात ज्या ठिकाणी वारंवार कचरा साठला जातो, अशी २०० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत.

पुणे : शहरात ज्या ठिकाणी वारंवार कचरा साठला जातो, अशी २०० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. याठिकाणचा कचरा उचलण्यासाठी पालिकेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. कचरा वाहनांचे नियोजन करून, शहरात कुठेही पडलेला कचरा २४ तासांच्या आत उचलला जाईल, अशी व्यवस्था घनकचरा विभागाने केली आहे.शहरातील प्रमुख रस्ते; तसेच उपनगरांत अनेक ठिकाणी कचरा साठतो, तो वेळीच उचलला जात नाही, त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन शहराच्या प्रतिमेला बाधा पोचत होती. यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकारातून महापौर प्रशांत जगताप यांनी बैठक बोलावली होती. सहआयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून तेथील स्वच्छतेवर भर द्यायला हवा. कचरागाड्यांचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार कचरा उचलला गेला पाहिजे, हे वेळापत्रक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तसेच, कंटेनरमध्ये कचरा न टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यावर काटेकोर देखरेख ठेवली पाहिजे.’’स्वच्छतेसाठी असलेल्या नवीन मशिन्सचा वापर दिवस-रात्र करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी खासगी कंपन्यांकडून जो निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, त्यामाध्यमातून ही कामे केली जात आहेत, असे घनकचरा विभागाने स्पष्ट केले. स्वच्छतेबाबत महापौरांनी सूचना दिल्या. (प्रतिनिधी)स्वच्छतागृहे दत्तक घ्यावीतसार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये देखभाल चांगल्याप्रकारे होत नाही. खासगी उद्योग, व्यवसाय समूहांच्या मदतीने स्वच्छतागृहे दत्तक घेऊन त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची सूचना वंदना चव्हाण यांनी केली. सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही देखभाल करण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येकी एक जेट मशीन पुरविण्यात येणार आहे.