शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

एचए मैदानात कचरा

By admin | Updated: May 30, 2016 01:47 IST

येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) मैदानावर नागरिक आणि विक्रेतेकचरा टाकतात.

नेहरुनगर : येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) मैदानावर नागरिक आणि विक्रेतेकचरा टाकतात. त्या कचऱ्याला आग लावत असल्यामुळे यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी वायुप्रदूषण वाढत आहे. येथील एचए मैदानावर काही दिवसांपासून नागरिक, व्यापारी, विक्रेते या मैदानाच्या मोकळ्या जागेत कचरा टाकतात. त्या कचऱ्याला आग लावत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर होत आहे. नेहरुनगर-महेशनगर रस्त्यावरील वाहनचालकांना या धुराचा त्रास होत आहे. धुरामुळे रस्ता व्यवस्थित दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच कचऱ्यामधील प्लॅस्टिक वस्तू जाळल्यामुळे दुर्गंधी पसरत असून, वायुप्रदूषणात भर पडत आहे. या दुर्गंधीमुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर दंण्डात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)>नेहरुनगर येथील मोकळ्या मैदानावर अनेक नागरिक कचरा आणून टाकत असल्यामुळे या मैदानाला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी असलेल्या कचऱ्याला एका अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे आग पसरली होती. अग्निशामक दलाने ती विझवली. कचरा टाकणाऱ्या व जाळणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.