शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

गँगस्टर नाईकच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: December 25, 2015 03:17 IST

खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गँगस्टर अश्विन नाईकसह पाच जणांच्या कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे

मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गँगस्टर अश्विन नाईकसह पाच जणांच्या कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या गुन्ह्यात फरार असलेल्या अल्पवयीन तरुणासह चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पियो हस्तगत करण्यात आली आहे. गुरुवारी वाढीव कोठडीसाठी नाईकसह त्याच्या पाचही साथीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ केली आहे. त्या पाठोपाठ या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका १७ वर्षीय तरुणासह चंदन तस्कर सन्नी पाल, मिलिंद परब (२२), अविनाश खेडकर (१७) ला गुरुवारी अटक करण्यात आली. पाटील आणि चंदन तस्कर केळूस्कर यांच्या आर्थिक व्यवहारातून वाद होता. हा वाद समोर आणून नाईक या प्रकरणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, खंडणीसाठी नाईकने पाटीलला केलेले कॉल रेकॉर्ड, तसेच सीसीटीव्ही फुटेज यामुळे नाईकच्या सुटकेची शक्यता धूसर आहे. आरोपींपैकी परब, खेडकर आणि अल्पवयीन मुलगा वगळता, केळूस्कर, जनार्दन सकपाळ, प्रथमेश परब, राजेश तांबे यांच्यावर हत्या, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केळूस्कर आणि पाल याला चंदन तस्करीमध्ये अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)