शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

गँगस्टर अश्विन नाईकला दादरमध्ये अटक

By admin | Updated: December 21, 2015 02:04 IST

दादरमधील बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी घेत असताना, गँगस्टर अश्विन नाईकसह त्याच्या चार साथीदारांना दादर पोलिसांनी रविवारी अटक केली.

मुंबई: दादरमधील बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाखांची खंडणी घेत असताना, गँगस्टर अश्विन नाईकसह त्याच्या चार साथीदारांना दादर पोलिसांनी रविवारी अटक केली. नाईकने यापूर्वी याच बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले होते. दादर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाचे पार्टनरशिपमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ९ डिसेंबर रोजी नाईक आणि त्याच्या साथीदारांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराचे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केले. अपहरणानंतर सुभाषनगर येथे अपहरण केलेल्यास जीवे ठार मारण्याची धमकी नाईकने दिली, तसेच ५० लाखांची खंडणी आणि नव्या इमारतीत ६ हजार स्वेअर फूट जागा देण्याची मागणी नाईकने केली. त्यानुसार घाबरलेल्या या व्यक्तीने २५ लाख रुपये नाईकला दिले होते. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यासाठी २० तारखेपर्यंतची वेळ त्याने नाईककडे मागितली होती.ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारच्या सुमारास नाईक आणि त्याचे साथीदार दादर येथील भवानी शंकर रोडवर उर्वरित खंडणी घेण्यासाठी येणार होते. त्यापूर्वीच संबंधित व्यावसायिकाने नाईकच्या भीतीला न जुमानता, दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक सदानंद राणे यांच्या तपास पथकाने नाईकसाठी सापळा रचला आणि कारवाई केली.एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन आणि आता बिल्डर व्यवसायात असणारा अश्विन नाईक हा चौथ्यांदा खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड झाला आहे. एन.एम. जोशी परिसरात राहण्यास असलेला नाईक २००९ मध्ये सर्व गुन्ह्यांतून मुक्त झाला होता. अश्विन नाईकवर १९९४ साली त्याच्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्याने दोन्ही पाय गमावले. तेव्हापासून आजपर्यंत नाईक व्हीलचेयर वरच आहे. अश्विन नाईक बिल्डर व्यवसायात शिरला. अनेक वेळा त्याचे विविध प्रकरणांत ३ ते ४ वेळा समोर आले होते. २०१४ मध्ये प्रकाश वसंत पाटकर या व्यक्तीने नाईक आणि त्याच्या साथीदारावर घर खाली करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी त्याला या प्रकरणी अटक केली होती, पण त्यानंतर तो जामिनावर सुटला होता.