शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात भरदिवसा गँगवॉर, एक जण ठार

By admin | Updated: May 12, 2016 19:28 IST

शहरातल्या सिडको भागात दिवसाढवळ्या दोन गँगमध्ये जोरदार वॉर भडकलं आहे.

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 12- शहरातल्या सिडको भागात दिवसाढवळ्या दोन गँगमध्ये जोरदार वॉर भडकलं आहे. यावेळी दोन्ही गँग समोरासमोर आल्यानं त्यांच्यात हाणामारीही झाली असून, गोळीबारही करण्यात आला. या गोळीबारात एक जण ठार झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पूर्ववैमनस्यातून हे गँगवॉर भडकल्याची माहिती आता समोर येते आहे. 
सिडको परिसरात रहदारीच्या स्टेट बँकच्या चौकात भरदिवसा गायकवाड-काळे-दांडेक-यांच्या गँगमध्ये वॉर भडकलं. या तिन्ही गँगमध्ये जोरदार हाणामारी झाली. लोखंडी सळ्या, लाठ्याकाठ्यांनी दोन्ही टोळ्यातील लोक एकमेकांवर वार करत होते. यावेळी त्यांच्याकडून गोळीबारही करण्यात आला.
या गोळीबारात अशोक दांडेकर हा ठार झाला. तर त्याचा सहकारी तात्या दांडेकर हा गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. शहरात गँगवॉर भडकल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.