शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डांबून ठेऊन तरूणीवर सामूहिक बलात्कार; चौघांना २० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 20:14 IST

मध्यप्रदेशातील आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. एस. व्ही हांडे यांनी २० वर्ष सक्तमजुरी

ऑनलाइन लोकमतबीड, दि. १४ - मध्यप्रदेशातील आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. एस. व्ही हांडे यांनी २० वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ३ हजार रुपये दंड तसेच अन्य तिघांना सहा महिने कैद व ५०० रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी गुरुवारी ठोठावली. मध्यप्रदेशातील ठेंगदा, ता. श्येवपूर, जि. मुरैना येथील पाच जणांचे आदिवासी कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातील दलालामार्फत अंबाजोगाई तालुक्यात आले होते. ऊसतोडणीसाठी या कुटुंबाची रवानगी सुगांव ता. अंबाजोगाई येथील मुकदम महादेव टोपाजी भागवत याच्याकडे झाली होती. यापैकी काही कुटुंबे पळून गेली होती. याचा राग धरुन मुकादम भागवत याने १३ ते १७ जानेवारी २०१५ या दरम्यान एका कुटुुंबाला डांबले.  एवढेच नाही तर या कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला. या घटनेला ग्रामस्थांनी वाचा फोडली. बर्दापूरठाण्यात ठाण्याच्या पोलिसांनी त्या पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून महादेव टोपाजी भागवत, पांडुरंग राजाभाऊ परकाडे, अंगद विष्णु शिंदे, नानासाहेब चत्रभुज शिंदे, विशाल महादेव भागवत, मंदाकिनी महादेव भागवत (सर्व रा. सुगांव, ता. अंबाजोगाई व सुरेश विवेक मस्के (रा. भावठाणा, ता. अंबाजोगाई) या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद कोला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अभय डोंगरे, सहायक निरीक्षक दिलीप जाधव, जमादार वशिष्ट कांगणे यांच्या पथकाने सर्व आरोपीस अटक केली. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. १७ साक्षीदार तपासलेसरकारी वकील दिलीप चौधरी यांनी या प्रकरणी एकूण १७ साक्षीदार तपासले. यात पीडित तरुणी, तिची आई व डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर झाल्याने न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी त्यांना दोषी ठरवले. महादेव टोपाजी भागवत, पांडुरंग राजाभाऊ परकाडे, अंगद विष्णु शिंदे, नानासाहेब छत्रभुज शिंदे या चौघांना २० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तर सुरेश विवेक मस्के, विशाल महादेव भागवत, मंदाकिनी महादेव भागवत याांना सहा महिने कैद व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.